शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

लोंढरे लघुप्रकल्पाची भिंत धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : शहादा तालुक्यातील लोंढरे गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या लघुप्रकल्पाची पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढून ...

लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : शहादा तालुक्यातील लोंढरे गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या लघुप्रकल्पाची पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढून १०० टक्के भरल्याने ओसंडून वाहत होते. मात्र लघुप्रकल्पाला मोठ्या प्रमाणात गळती लागून भगदाड पडले आहे. येणाऱ्या पावसाळ्यात काही अघटीत झाल्यास धरण लगतच्या सात गावांना धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही लघुपाटबंधारे विभाग दुर्लक्ष करीत आहे.यावर्षी समाधानकारक पावसामुळे तालुक्यातील सर्वच नद्यांना पूर आल्याने तालुक्यातील सर्वच धरणे, लघुप्रकल्प भरले होते. तालुक्यातील लोंढरे गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेला लघुप्रकल्पही भरून ओसंडून वाहत होता. मात्र लघुप्रकल्पाला मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. या भिंतीच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी वारंवार लघुपाटबंधारे विभाग यांच्याकडे लेखी, तोंडी तक्रार करूनही अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. लोंढेरे गावालगत असलेले प्रकल्पाचे काम सन १९९९ ला पूर्ण झाल्यानंतर हे पाणी कुकावल, कोठली, लोंढरे या गावांच्या परिसरातील शेतकºयांना शेतीसाठी व पिण्यासाठी उपयोगी पडते. या धरणातील ओसंडून पाहणारे पाणी लगतच्या चार नाल्यांमधून सोडून ते शेती उपयोगासाठी वापरण्यात येते. यावर्षी २६३ हेक्टर जमीन लघुप्रकल्पाच्या पाण्याने ओलिताखाली आली आहे त्याचा फायदा परिसरातील शेतकºयांना उत्तमरित्या झाला आहे. सुमारे १३ वर्षाअगोदर हा प्रकल्प पूर्ण भरला होता. त्यानंतर यंदा झालेल्या पावसाळयात तो प्रकल्प पूर्ण भरला होता. अतिवृष्टीमुळे १०० टक्के भरल्याने सांडव्यातून पाणी वाहून गेले. गेल्या १३ वर्षात पाणी न आल्याने प्रकल्पाच्या भिंतीला ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तसेच काही ठिकाणी मोठे वृक्षही आहेत. त्यामुळे प्रकल्पाची भिंत कमजोर झाली असून काही ठिकाणी मोठे भगदाड पडले आहे. प्रकल्पाची परिस्थिती पाहिली असता भिंत जर अचानक तुटली तर लोंढरे जयनगर, निंभोरा, धांद्रे, मातकूट, बोराळे, कुकावल, कोठली या सात गावात पाणी शिरून तेथील लोकांचा संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.धरणातील सांडव्याच्या भिंतीची दुरुस्तीबाबत लोंढरे, कहाटूळ, जयनगर या परिसरातील नागरिकांनी वारंवार लघुपाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री यांच्याकडे गेल्या चार ते पाच वर्षापासून तक्रारी करूनही जनतेच्या तक्रारींना यश आले नाही.याबाबत गेल्या अनेक महिन्यापासून ग्रामस्थांनी निवेदन देऊनही लघुपाटबंधारे विभाग दुर्लक्ष करीत आहे. या प्रकल्पाच्या गळतीमुळे परीसरातील सात गावांना धोका असताना लघुपाटबंधारे विभाग निद्रीस्त अवस्थेत का आहे? असा सवाल नागरिकांनी केला आहे. नागरिकांमध्ये याबाबत संताप व्यक्त होत आहे. लघुप्रकल्पाची दुरुस्ती युद्धपातळीवर संबंधित विभागाने करावी अन्यथा मुख्यमंत्र्यांना भेटून यासंदर्भात निवेदन देण्यात येईल, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.