शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

शेतशिवारातील बिघाड झालेला ट्रान्सफार्मर मिळतो सात दिवसांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 15:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  वीज वितरण कंपनीच्या शहादा व नंदुरबार या दोन विभागात एकूण ५४ हजार वीजजोडण्या ह्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  वीज वितरण कंपनीच्या शहादा व नंदुरबार या दोन विभागात एकूण ५४ हजार वीजजोडण्या ह्या कृषीपंपधारक शेतक-यांना दिल्या गेल्या आहेत. यासाठी तब्बल २२० मेगावॉट वीज सध्या वापरली जात असून, रब्बी हंगामात हा वापर वाढून ट्रान्सफार्मर नादुरूस्त होण्याच्या समस्याही वाढत आहेत.            जिल्ह्यात शेतशिवारात होणाऱ्या विजेचा पुरवठा करण्यासाठी ३४ मंडळात वीज ट्रान्सफार्मरर्स लावण्यात आली आहेत. साधारण १० ते १०० किलो वॉट क्षमतेच्या ट्रान्सफार्मर्सवरुन  शेतकऱ्यांना दिवसाच्यावेळी ११० आणि रात्रीच्या वेळी ११० अशी २२० मेगावॉट वीज पुरवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील विविध भागात रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते ४८ तास ते सात दिवसांच्या आत बदलून दिले जात असल्याची माहिती वीज वितरण कंपनीकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध भागात रब्बी हंगामासाठी विजेचे नियमन करण्यात आले असून, रात्री १० ते सकाळी आठ अशा दहा तास वीजपुरवठा करण्यात येत आहे. कंपनीतर्फे दिवस-रात्र शेड्यूलनुसार वीजपुरवठा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या सर्वच ठिकाणी ट्रान्सफार्मर्स हे चांगले असल्याची माहिती देण्यात आली आहे. परंतू शेतकरी मात्र वीजेचा दाब कमी असल्याचे सांगत आहेत. 

रोहित्र जळाल्याचा ऊस पिकाला बसताेय फटका

            शेत शिवारात सध्या ऊस, केळी, पपई ही बागायती पिके तर गहू, हरभरा ही रब्बी पिके आहेत. वीज पुरवठा बंद झाल्यास या पिकांचे नुकसान होते.   वीज वितरण कंपनीकडून ट्रान्सफार्मर दुरूस्तीसाठी नेल्यानंतर त्यासाठीचा खर्चही तेच करत असल्याची माहिती शेतक-यांनी दिली. 

तक्रार करूनही प्रतिक्षेतच               जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात शेतशिवारातील वीज पुरवठा करणा-या ट्रान्सफार्मर्सची स्थिती चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू ट्रान्सफार्मर्स नादुरूस्त झाल्यानंतर मात्र अनंत अडचणींचा सामना शेतकरी करतात. तक्रारींना उशिरा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आहे.  

नजरेसमोर होते पिकांचे नुकसान             एक ट्रान्सफार्मर येण्यास सात दिवस किंवा त्यापेक्षा अधिक वेळ लागतो. या काळात केेळी, ऊस तसेच इतर रब्बी पिकांना पाणी देण्याची सुविधा नसल्यास पाण्याअभावी पिक करपत असल्याचे शेतकरी पाहतात. समोर दिसूनही नुकसान सोसता येत नसल्याने ते हलबल होतात. 

शेतक-यांना सध्या वेळेवर वीज मिळत आहे. यातून पिकांना पाणी देणे सुरळीत होत आहे. यापूर्वी  मात्र अनेक अडचणी येत होत्या. ट्रान्सफार्मर वेळीच मिळण्यास अडचणी होत्या. अद्यापही आहेत. सात दिवसांऐवजी दोन दिवसात ट्रान्सफार्मर देण्याचे नियोजन कंपनीने करावे. - भगवान देविदास चाैधरी, शेतकरी, मोड ता. तळोदा.

वीज वितरण कंपनीकडून तातडीने कामकाज होते. शेतक-यांच्या तक्रारी निकाली काढण्यावर भर दिला जात आहे. सध्या जिल्ह्यात नादुरूस्त रोहित्रांची संख्या ही अत्यंत कमी आहे. त्यांची दुरूस्तीही तातडीने करुन दिली जात आहे. - ए.ई.बोरसे, अधिक्षक अभियंता