६२७ घरांचे २६ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 12:54 PM2020-06-22T12:54:28+5:302020-06-22T12:54:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या तळोदा तालुक्यातील ६२७ घरांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल प्रशासनाने नुकतेच पूर्ण ...

Damage of Rs 26 lakh to 627 houses | ६२७ घरांचे २६ लाखांचे नुकसान

६२७ घरांचे २६ लाखांचे नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या तळोदा तालुक्यातील ६२७ घरांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल प्रशासनाने नुकतेच पूर्ण केले आहे. या वादळात २६ लाखांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे. आता नुकसानग्रस्तांना भरपाईची प्रतिक्षा लागून आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पाठपुरावा करण्याची मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.
दरम्यान तºहावद येथील प्रकल्पग्रस्तांचेही गेल्या चार दिवसापूर्वी झालेल्या पावसात नुकसान झाले होते. परंतु शासनाच्या नियमात त्यांचे नुकसान बसत नसल्यामुळे या विस्थापितांना नुकसानीपासून वंचित राहावे लागत असल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या ११ जून रोजी जोरदार वादळासह झालेल्या मुसळधार पावसामुळे तळोदा तालुक्यातील मोड, कळमसरे, तºहावद, रेवानगर, भवर, बोरद, खरवड या गावामधील रहिवाशांच्या घरांचे पत्रे, छप्पर उडून प्रचंड नुकसान झाले होते. काही गावांमध्ये घरांना मोठा फटका बसला होता. साहजिकच घरांचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर प्रत्यक्ष गावांमध्ये जावून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार तळोदा तालुक्यात साधारण ६२७ घरांचे या वादळी पावसामुळे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. त्यात रहिवाशांचे २६ लाखांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. संबंधितांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तसा अहवालही प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. आता नुकसानग्रस्तांना शासनाच्या आर्थिक मदतीची प्रतिक्षा लागून आहे. कारण गेल्या चार महिन्यांपासून राज्य शासनाच्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमिवर ग्रामीण भागातील जनतेपुढे रोजगाराचा प्रश्न होता. त्यानंतर लॉकडाऊनच्या धोरणात शासनाने शिथिलता आणल्यानंतर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे. साहजिकच त्यातून जशी-तशी पोटाची खळगी भरली जात आहे. त्यावरच कुटुंबांची सध्या गुजरान केली जात आहे, असे असले तरी संसार उघडा पडू नये म्हणून नुकसानग्रस्तांनी उधार, उसणवारी व व्याजाने पैसे घेऊन घरांची दुरूस्ती करत पुन्हा संसार नव्याने उभा केला आहे. मात्र घेतलेले पैसे देण्याची चिंता आता सतावत असल्याची व्यथाही काही नुकसानग्रस्तांनी बोलून दाखविली आहे. आधीच पुरेसा कामधंदा नसल्यामुळे उधार उसनवारीचे प्रपंच चालविला होता. त्यानंतर आसमानी संकटाने घरांचे मोठे नुकसान केल्याने चिंतेत भरच पडली आहे. त्यामुळे आम्हा गरीब नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तरी पुढाकार घ्यावा, अशी मागणी या रहिवाशांनी केली आहे. कारण तत्काळ शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांीन दिले आहे.

गेल्या १० दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसात मोड १०६, खरवड १०४, कळमसरे ४५, तºहावद ३९, भवर २५, बोरद १०, रेवानगर पुनर्वसन आठ या प्रमाणे गावनिहाय घरांचे नुकसानीचा पंचनामा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. असे असले तरी तळोदा तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी मध्यरात्रीनंतर आलेल्या पावसामुळे सरदार सरोवर प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसन वसाहतींमधील १५ घरांमध्ये गटारीचे पाणी शिरल्यामुळे या विस्थापितांचे घरांचे नुसानी बरोबर अन्नधान्याचे नुकसान झाले आहे. त्यांनी वर्षभरासाठी साठवलेले धान्यही पाण्यात वाहून गेल्याचे विस्थापितांनी सांगितले. महसूल प्रशासनाने त्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले असले तरी शासनाच्या पर्जन्य वृष्टीच्या नियमात बसत नसल्यामुळे त्यांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक शासकीय यंत्रणांच्या उदासिन धोरणामुळे त्यांना नुकसानीचा फटका बसला आहे. असा बाधितांचा आरोप आहे. वसाहतींमध्ये ज्या गटारी केल्या आहेत. त्यांची एकदाही साफ-सफाई करण्यात आलेली नाही. शिवाय त्यांची खोली व रूंदीदेखील कमी आहे. त्यामुळे त्या आधीच गाळाने भरल्या आहेत. त्यामुळे गटारींमधील पाणी पुढे न सरकता ते थेट घरांमध्येच शिरले होते. वास्तविक पावसाळ्यापूर्वी नाला खोलीकरणाबरोबरच गटारींची स्वच्छता, डागडुजी करण्याची मागणी वसाहतीतील रहिवाशांनी सातत्याने केली होती. मात्र त्याकडे संबंधीत यंत्रणांनी साफ दुर्लक्ष केले आहे. एवढेच नव्हे गेल्या वर्षीदेखील नाल्याच्या पुराचे पाणी वसाहतीतील घरांमध्ये शिरले होते. तरीही प्रशासनाने यातून धडा घेतलेला नाही. आता म्हणतात शासनाच्या मदती निकषात बसत नाही, असा संतप्त सवालही बाधितांनी उपस्थित केला आहे.

नुकत्याच झालेल्या पावसामुळे घरामध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे. पाण्यामुळे घरातील वस्तु व धान्यदेखील खराब झाले आहे. तलाठ्यांनी पंचनामा केला आहे. आता तत्काळ आधार देण्यासाठी आर्थिक मदत मिळायला पाहिजे. पावसाळ्यात नेहमीच गटारी अथवा पुराच्या पाण्याची समस्या उद्भवत असते. परंतु प्रशासन उपाययोजनांबाबत काहीच करायला तयार नाही. त्यामुळे वैतागलो आहोत.
-शामजी पाडवी, प्रकल्पग्रस्त,
तºहावद पुनर्वसन, ता.तळोदा

Web Title: Damage of Rs 26 lakh to 627 houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.