शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

केळीचे 200 घड कापून नुकसान

By admin | Updated: April 1, 2017 00:29 IST

कुढावद शिवारातील घटना : एक लाखाचे नुकसान, शेतमालकाच्या सतर्कतेमुळे चोरटय़ांचा प्रय} फसला

शहादा : तालुक्यातील कुढावद शिवारात तीन एकर क्षेत्रातील सुमारे  एक लाख रुपये किमतीचे 200 केळीचे घड कापून नुकसान केल्याची घटना घडली. मात्र संबंधित शेतमालकाच्या सतर्कतेमुळे हे            घड चोरून नेण्याचा चोरटय़ांचा   प्रय}  फसला. पोलिसांनी  चोरटय़ांचा शोध घेऊन बंदोबस्त करण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.
याबाबत वृत्त असे की, कुढावद, ता.शहादा येथील नरोत्तम रतिलाल पाटील व भरत रतिलाल पाटील यांनी पिंपळोद-कुढावद रस्त्यालगत असलेल्या शेतात तीन एकर क्षेत्रात केळीची लागवड केली आहे. त्यांच्या केळीचे घड तयार झाले असून दोन दिवसांपूर्वीच एका व्यापा:याशी माल विक्रीचा व्यवहार झाला होता. एक-दोन दिवसात केळीचे घड तोडण्याबाबत व्यापारी व शेतकरी यांच्यात ठरले होते. गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नरोत्तम पाटील हे शेतातून घरी आले. त्यानंतर रात्री नऊ वाजता वीजपुरवठा सुरू होतो म्हणून पिकांना पाणी देण्यासाठी ते परत शेतात आले. पाटील हे साडे नऊ वाजेच्या सुमारास लाईट व मोटार सुरू करून पिकांना पाणी देत होते. त्यावेळी त्यांनी झाडांवरील केळीचे घड कापल्याचे निदर्शनास आले. शेतातून          रस्त्यार्पयत सुमारे 200 पेक्षा जास्त केळीचे घड कापून ठेवलेले होते. सध्या केळीला 1500 रुपयांचा भाव असल्याने सुमारे एक लाख रुपये किमतीचा हा माल होता. एक-दीड तासातच 200 केळीचे घड कापून रस्त्यावर व्यवस्थित ठेवण्यात आलेले होते. त्यावरून हे चोर 10 ते 15         जण असण्याची शक्यता आहे.  चोरांनी पद्धतशीरपणे नियोजन केले होते. हे केळीचे घड वाहून नेण्यासाठी वाहनही आणले असावे, असा अंदाज आहे.
शहादा तालुक्यात शेतातून शेती साहित्याची चोरी व तयार झालेला शेतमाल चोरून नेण्याच्या घटना ह्या कायमच्या झाल्या आहेत. याबाबत शेतक:यांनी पोलिसांना वेळोवेळी लेखी व तोंडी कळवूनही या चोरटय़ांचा बंदोबस्त होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कुढावद येथे केळीचे घड कापून चोरून नेण्याचा चोरांचा प्रय} शेतक:याच्या सतर्कतेमुळे फसला असला तरी या चोरटय़ांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.
   शहादा तालुक्यातील शेतातून शेती साहित्याची चोरी, शेतमालाची चोरी या घटना नेहमीच घडतात. म्हसावद-पिंप्री परिसरात तर चक्क विजेचे ट्रान्सफॉर्मर चोरी करताना चोरटय़ांना शेतक:यांनी रंगेहात पकडले होते. शेतमालाची व शेती साहित्याची चोरी करण्यासाठी चोरटय़ांकडून विविध क्लृप्त्या वापरल्या जातात. गुरुवारी रात्री कुढावद शिवारातील केळीच्या शेतातून सुमारे 200 केळीचे घड कापून ते रस्त्यार्पयत आणून ठेवण्यात आले होते. वाहनाद्वारे हे केळीचे घड लंपास करण्याचा चोरटय़ांचा प्रय} असावा. मात्र संबंधित शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात आल्याने चोरटय़ांचा हा प्रयत्न फसला असला तरी भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून पोलिसांनी चोरटय़ांचा वेळीच बंदोबस्त करण्याची अपेक्षा  त्रस्त शेतक:यांकडून व्यक्त होत आहे.