शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन मशिन कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन महिन्याभरापासून खराब झाल्यामुळे बंद पडले आहे. त्यामुळे या रुग्णालयातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन महिन्याभरापासून खराब झाल्यामुळे बंद पडले आहे. त्यामुळे या रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांना बाहेरील खासगी दवाखान्यातून सीटी स्कॅन करून आणावे लागत आहेत. वाढत्या महागाईत गरीब रुग्णांना वाजवी खर्च आजारातून पूर्णपणे सुटका होण्यासाठी जिल्हा रुग्णालयच आशेचे स्थान ठरते. जिल्हा रुग्णालयात गंभीर आजरांचे निदान करण्यासाठी सीटी स्कॅन मशीन कार्यान्वित करण्यात आले आहे. याद्वारे रुग्णांच्या आजारांचे  योग्य निदान करीत त्यांच्यावर उपचार करण्यात येतो. परंतु हे मशिनच महिनाभरापासून बंद असल्यामुळे तेथे गंभीर आजारांचे निदान करता येत नाही. बहुतांश रुग्णांना बाहेरुन सीटी स्कॅन करीत अजाराचा अहवाल सादर करावा लागत आहे. त्यातून गरीब रुग्णांना न पेलवणारा खर्च करावा लागत आहे. आधीच नंदुरबार हा मागासलेला जिल्हा असून जिल्ह्यात मागास नागरिकांचीच अधिक संख्या आहे. या मागास समाजातच सर्वाधिक गंभीर स्वरुपाचे आजार निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात सीटी स्कॅन मशिनसारख्या यंत्रणेची नितांत आवश्यकता भासत आहे. सर्व सामान्यांच्या सुविधेसाठी ताडीने मशिन सुरु करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.  

सीटी स्कॅन मशिन पडताच जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत नवीन मशिन उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविला होता. प्रस्ताव मंजूर होऊन शासनाकडून नवे मशिनही उपलब्ध झाले आहेत. परंतु हे मशिन सुरू करण्यासाठी अधिक दाबाच्या वीजेची आवश्यकता भासत आहे. या मशिनला अनुसरून वीज पुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे हे मशिन पडूनच असल्याचे सांगण्यात येते. वाढीव वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाच्या पातळीवरुन  कार्यवाही सुरू असल्याचे देखील सांगण्यात आले.