छत्री खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST2021-06-22T04:21:14+5:302021-06-22T04:21:14+5:30

नंदुरबारच्‍या बाजारात विविध प्रकारच्‍या छत्र्या आल्‍या असून, लहान मुलांच्‍या छत्र्यांमध्‍ये विविध आकार उपलब्‍ध आहेत. या छत्र्यांवर कार्टून, विविध प्राण्‍यांचे ...

Crowds in shops to buy umbrellas | छत्री खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी

छत्री खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी

नंदुरबारच्‍या बाजारात विविध प्रकारच्‍या छत्र्या आल्‍या असून, लहान मुलांच्‍या छत्र्यांमध्‍ये विविध आकार उपलब्‍ध आहेत. या छत्र्यांवर कार्टून, विविध प्राण्‍यांचे फोटो, चित्रे असून त्‍या लहानग्‍यांचे लक्ष वेधून घेत आहेत. लहान मुलांच्‍या छत्र्यांमध्‍ये लांब दांड्याच्‍या आणि कलरफुल छत्र्यांना जास्‍त मागणी आहे. लेडीज छत्रीत वेगवेगळे प्रकार खूप आहेत. तीन व चार फोल्‍डच्‍या छत्र्याही बाजारात आल्‍या आहेत. मात्र, ग्रामीण भागातील जोरदार पाऊस आणि वाऱ्यांमुळे त्‍या टिकत नसल्‍याने त्‍यांना फारशी मागणी नाही. लाकडी लांब दांड्याच्‍या छत्र्या काहीशा महाग आहेत. ३०० ते ३५० रुपये त्‍यासाठी मोजावे लागत आहेत. मात्र त्‍या मजबूत असल्‍याने त्‍यांना पसंती मिळत आहे. महिलांसाठी तीन फोल्‍ड २५० ते ३५० रुपये, डबल कोटिंग १५० ते २५० रुपये, लहान १५० ते २०० रुपये, फ्रिल छत्री ३०० ते ५०० रुपये, लांब दांडी २०० ते २५० रुपयांपर्यंत मिळत आहेत.

Web Title: Crowds in shops to buy umbrellas