शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईच्या भीतीने गर्दी थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST

नंदुरबार : जिल्हाधिकारी यांनी गर्दी होईल, असे कार्यक्रम उपाययोजनांसह सुरू ठेवण्याचे आदेश काढले आहेत. या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातील बाजारपेठेत ...

नंदुरबार : जिल्हाधिकारी यांनी गर्दी होईल, असे कार्यक्रम उपाययोजनांसह सुरू ठेवण्याचे आदेश काढले आहेत. या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातील बाजारपेठेत येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. दुसरीकडे लग्नसोहळे आणि अंत्यविधीच्या गर्दीतही घट आल्याचे दिसून आहे. कारवाई आणि कोरोना या दोघांच्या भीतीने ही स्थिती निर्माण झाली आहे.

शहरात तीन दिवसात सुमारे ७०० रुग्ण समोर आले असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यातून विविध उपाययोजना करत कामकाज सुरू करण्यात आले आहे. सर्वच ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी नागरिक व व्यावसायिकांनी दिली.

अद्याप कारवाई नाही

जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी सायंकाळी आदेश काढल्यानंतर बुधवारी शहरातील विविध भागात फिरून आढावा घेतला होता. यात सर्वच ठिकाणी नियमांचे पालन झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, शहर व उपनगर पोलिसांच्या हद्दीत प्रत्येकी दोघांवर मास्कचा वापर न केल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

चित्रपटगृहे

नंदुरबार शहरात एक एकपडदा सिनेमागृह, तर एक मल्टिप्लेक्स सिनेमागृह आहे. हे दोन्ही सध्या बंद आहेत. कोरोनामुळे संबंधित मालकांनी ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बंदची वर्षपूर्ती होणार आहे.

विवाह सोहळे

शहरातील मंगल कार्यालयांमध्ये भेटी दिल्या असता शुकशुकाट दिसून आला. तारखांवेळी कोरोना उपाययोजना करणार असल्याचे सांगण्यात आले. एक ठिकाणी विवाहाला तुरळक गर्दी होती.

अंत्यविधी

शहरातील साक्री नाका भागातील स्मशानभूमीत तपासणी केली असता, कोरोनामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच अंत्यविधी होत असल्याचे सांगण्यात आले. याठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेत आहेत.

कार्यालये

शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालय, बाजार समिती याठिकाणी नियमांचे पालन होत आहे. केवळ बँकांमध्ये मात्र सकाळपासून गर्दी असल्याचे दिसून आले. याकडे बँकांनीच लक्ष देण्याची अपेक्षा आहे.

गृह विलगीकरण

शहरातील विविध भागात दर दिवशी किमान एक किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण समोर येत आहेत. या रुग्णांचे वास्तव्य असलेल्या घराबाहेर बोर्ड लावण्याचा मात्र संबंधित विभागाला विसर पडला आहे.