शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणीसाठी होणा-या गर्दीत कोविड नियमांची गच्छंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शहरातील विभागीय जात पडताळणी कार्यालयालय व सामाजिक न्याय भवनातील जिल्हा जात पडतळणी समिती कार्यालयात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  शहरातील विभागीय जात पडताळणी कार्यालयालय व सामाजिक न्याय भवनातील जिल्हा जात पडतळणी समिती कार्यालयात सध्या ग्रामपंचायत निवडणूक लढवणा-या इच्छुकांची गर्दी होत आहे. दरदिवशी होत असलेल्या या गर्दीत कोविड नियमांचे उल्लंघन होत असतानाही प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे. खान्देशातील तिन्ही जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक असल्याने अनुसुचित जमाती राखीव जागांसाठी निवडणूक लढवू इच्छिणारे सध्या कागदपत्रांची पूर्तता करत आहेत. यात प्रमुख प्रमाणपत्र म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र घेण्यासाठी गर्दी होत आहे. नंदुरबार येथे अनुसुचित जमाती जात पडताळणीचे विभागीय कार्यालय असल्याने याठिकाणी २३ डिसेंबरनंतर गर्दी होत आहे. नाताळच्या एक दिवसाची सुटी वगळता शनिवार आणि रविवारी जात पडताळणी समितीचे कामकाज सुरु होते. यावेळीही मोठ्या प्रमाणात या आवारात गर्दी झाली होती. या गर्दीला आवर घालणे मुश्किल असल्याने अधिकारी व कर्मचा-यांनी मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवत एक खिडकी योजनांसारखे प्रस्ताव घेणे सुरु ठेवले होते. महिलांना प्रथम प्राधान्य देण्यात आले असले तरी एकाच पॅनलच्या दोन ते तीन महिला एकाचवेळी पुढे येत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. संबधित विभागाचे कर्मचारी सांगूनही योग्य त्या उपाययोजनांना प्राधान्य दिले गेले नसल्याचे दिसून आले. यात विद्यार्थी वर्ग व पालकांची गळचेपी होत होती.  

विद्यार्थ्यांना प्राधान्य१२ वीनंतर पुढच्या शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी नीट व इतर परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रस्तावही दाखल करुन घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत अडथळे येऊ नयेत यासाठी समितीकडून कामकाज सुरु आहे. ग्रामपंचायत निवडणूकीसाठी होणा-या गर्दीतही या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जात असल्याची माहिती देण्यात आली. 

उमेदवारांची रेटारेटीशेजारीत धुळे व जळगाव जिल्ह्यातून येणारे अनेक जण सोबत दोन-चार कार्यकर्ते आणत असल्याने याठिकाणी अनावश्यक गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे. प्रस्ताव दाखल करतानाही सोबतचेच पुढे-पुढे करत असल्याने कोविड नियमांचा भंग होत आहे. काही तास या आवारात थांबणारे मिळेल त्या जागी बसून राहत असल्याचेही दिसून आले आहे. 

प्रशासनातर्फे दक्षतादक्षता म्हणून जात पडताणी समितीने पोलीस बंदोबस्त तैनात करुन होणा-या गर्दीला आवर घालण्याचा प्रयत्न केला होता. कर्मचारी कोरोना उपाययोजना म्हणून सॅनेटायझर व वेळ पडल्यास ग्लाेव्हजही वापरत आहेत. देणा-यांनाही याबाबत सूचना केली जाते.  रोज २०० अर्जगेल्या २३ डिसेंबरपासून जात पडताळणी समितीकडे किमान दीड हजार प्रस्ताव ग्रामपंचायत निवडणूक लढवणा-यांनी दाखल केले आहेत. सोबत ५०० च्या जवळपास विद्यार्थ्यांनीही अर्ज केले आहेत. रविवारी दिवसभरात १३० ग्रामपंचायत इच्छुकांनी अर्ज दाखल केले.  

अधिकारीच झाले त्रस्त दरम्यान समितीचे सहायक संचालक एस.ई.भालेकर यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले. यावेळी कार्यालयात संपर्क केला असता, ग्रा.प निवडणूकीसाठी जात पडताळणी प्रस्ताव देणा-या काहींसाठी लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी यांचे फोन येत असल्याने अधिकारी कर्मचारी इतर कामे त्यांची कामे करत असल्याने बोजा पडत असल्याचे सांगण्यात आले.