शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

भालेर येथे वीजपुरवठा खंडित असल्याने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST

जिल्ह्यात २३ मार्च रोजी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेक गावांमध्ये गारपीट झाली होती. या वादळात घरांचे, शेतीचे आणि वीज ...

जिल्ह्यात २३ मार्च रोजी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेक गावांमध्ये गारपीट झाली होती. या वादळात घरांचे, शेतीचे आणि वीज खांबांचे मोठे नुकसान झाले. भालेर परिसरात गारांमुळे शेतीपिकांची मोठी नासाडी झाली. शेतशिवारातील जीर्ण वीजतारा तुटणे, खांब वाकणे, खांब पडणे अशा अनेक घटना घडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान, भालेर गावात तीन दिवसांपर्यंत वीजपुरवठा खंडित राहिला. त्यानंतर गावांमधील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मात्र शेतशिवारातील वीजपुरवठा अद्याप सुरू न झाल्यामुळे वादळी पावसात वाचलेली पिके पाण्यावाचून जळत आहेत.

वीजपुरवठा खंडित होऊन आठवडा उलटला तरी भालेर परिसरात वीजखांब बदलवणे, दुरुस्ती करणे, वीजतारा नवीन टाकण्याचे काम संथ गतीने चालत असल्याने कृषी पंपांचा विद्युत पुरवठा अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. पाण्याअभावी पिके करपत असल्याने भालेर परिसरातील शेतकऱ्यामध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत. शेतपिकांतील ज्वारी, बाजरी, मका, मूग, भुईमूग व भाजीपाला पिके पाण्याअभावी करपत असून वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

दरम्यान, संबंधित वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांकडून वारंवार संपर्क साधला असता कर्मचाऱ्यांकडून वीजतारा नवीन टाकणे, वीजखांब उभे करणे ही कामे संथ गतीने चालू असून होलिकोत्सव, संचारबंदी यासारख्या कारणांमुळे पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात आहे. वीज पोल दुरस्ती करण्यासाठी ५ ते ६ दिवसांचा कालावधी लागणार असल्याने यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून याबाबत वीज वितरण कंपनीने दखल घेऊन त्वरित वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.