लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी नवापूर येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनुसार, नवापूर येथील देवळफळी भागात पाचजण आपसात झोंबाझोंबी करून आरडाओरड करीत होते. पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन पाच जणांवर गुन्हा दाखल केला. याबाबत हवालदार विकास पाटील यांनी फिर्याद दिल्याने अयुबखान फलीलखान पठाण, इम्तियाज आयुबखान पठाण, इजाजबखान आयुबखान पठाण सर्व रा. इस्लामपूरा, अमीनशेख सरफोद्दीन शेख, परवीनबी सरफोद्दीन शेख रा.देवळफळी, नवापूर यांच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार प्रमोद वंजारी करीत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}