नंदुरबारात दूध विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 12:39 IST2020-07-27T12:39:32+5:302020-07-27T12:39:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग न पाळता दूध विक्री करणाऱ्या दोघांवर नंदुरबारात गुन्हा दाखल ...

Crime filed against milk sellers | नंदुरबारात दूध विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

नंदुरबारात दूध विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग न पाळता दूध विक्री करणाऱ्या दोघांवर नंदुरबारात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबारात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. दूध विक्रीसाठी सकाळी नऊ वाजेच्या आतची वेळ देण्यात आली आहे. असे असतांनाही निझर रस्त्यावरील सी.बी.पेट्रोल पंपाजवळ सार्वजनिक ठिकाणी दूध विक्री सुरू होती. त्यासाठी येणाºया ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंगचे कुठलेही पालन करण्याच्या सुचना विक्रेत्याकडून दिल्या जात नव्हत्या. यामुळे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राकेश चंद्रशेखर बिहारी, रा.पळाशी व सागर राजूभाई भरवाड, रा.गायत्रीनगर नंदुरबार यांच्याविरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद पोलीस नाईक कपील बोरसे व जगदीश पाटील यांनी दिली.

Web Title: Crime filed against milk sellers