नंदुरबारात अवैध मांस वाहतूक प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 12:01 IST2020-01-13T12:00:59+5:302020-01-13T12:01:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातून अवैध मांस वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई करत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे़ शनिवारी ...

 Crime against two in Nandurbar for illegal meat trafficking | नंदुरबारात अवैध मांस वाहतूक प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा

नंदुरबारात अवैध मांस वाहतूक प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातून अवैध मांस वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई करत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे़ शनिवारी सकाळी साडेसात वाजता ही कारवाई करण्यात आली़
शनिवारी सकाळी खोडाई माता रस्त्यावरुन दोघे जण अवैध मांस वाहून नेत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती़ त्यानुसार त्यांनी परिसरात तपासणी केली असता जी़जे़१९-२७३९ या दुचाकीवरुन शेख सुलतान शेख रसूल कुरेशी व शेख रसुल शेख रहेमान कुरेशी दोघे रा़ कुरेशी मोहल्ला हे दोघेही ३० किलो मांस वाहून नेत असल्याचे दिसून आले़
याबाबत इम्रान शरीफ खाटीक यांच्या फिर्यादीवरुन सुलतान रसूल कुरेशी व रसूल रहेमान कुरेशी या दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़

Web Title:  Crime against two in Nandurbar for illegal meat trafficking