वराह चोरी करणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:11 IST2020-02-04T12:11:24+5:302020-02-04T12:11:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चिंचपाडासह परिसरातून ३० हजार रुपयांचे वराह चोरून नेल्याप्रकरणी खांडबारा येथील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

A crime against eight people who stole Varah | वराह चोरी करणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा

वराह चोरी करणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चिंचपाडासह परिसरातून ३० हजार रुपयांचे वराह चोरून नेल्याप्रकरणी खांडबारा येथील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वराह चोरीच्या घटना या भागात वारंवार घडत आहेत. त्यामुळे वराहपालकांनी नाराजी व्यक्त केली.
चिंचपाडा येथील सायबाई राजाराम वडूर यांच्या मालकीचे परिसरात वराह सोडण्यात आले आहेत. खांडबारा येथील साहेबराव बाळू वडूर व इतरांनी हे सर्व वराह पकडून चोरून नेल्याचा आरोप सायबाई वडूर यांनी केला आहे. या वराहांची एकुण किंमत ३० हजार रुपये आहे. ठिकठिकाणी तपास केला असता साहेबराव वडूर यांनीच ते चोरून नेल्याचे लक्षात आल्यावर सायबाई वडूर यांनी नवापूर पोलिसात फिर्याद दाखल केली.
त्यांच्या फिर्यादीवरून साहेबराव बाळू वडूर, संजय गंगाराम वडूर, भैय्या शामराव वडूर, आकाश बापू शिंदे, लक्ष्मण साहेबराव शिंदे, सुरेश तात्या शिंदे, सुनिल बुध्या शिंदे, राकेश वडार यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार वळवी करीत आहे.

Web Title: A crime against eight people who stole Varah