शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

काटेरी हलव्याच्या दागीन्यांची क्रेझ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : काटेरी हलवा मकर संक्रांतीचा गोडवा वाढवितो. त्याच हलव्याचे दागिने देखील मन मोहून घेतात. मकरसंक्रांतीनिमित्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : काटेरी हलवा मकर संक्रांतीचा गोडवा वाढवितो. त्याच हलव्याचे दागिने देखील मन मोहून घेतात. मकरसंक्रांतीनिमित्त तयार करण्यात आलेल्या दागिन्यांची क्रेझ यंदाही कायम राहिली आहे. अनेक ठिकाणी अशा प्रकारचे दागिने विक्रीसाठी दाखल झाले आहेत. तसेच नंदुरबारात मोजकीच कुटुंब हे दागिने तयार करतात. खास मकर संक्रांति साठी बनविण्यात येणारे काटेरी हलव्याचे दाण्यांचे दागिने महिला वर्गाची पहिली पसंती असते. पूर्वी या दागिन्यांची या भागात पाहिजेत अशी क्रेझ नव्हती     मात्र गेल्या काही दिवसापासून या दागिन्यांची मागणी वाढू लागली आहे संक्रांतीला तिळगुळाच्या स्वरूपात दिला जाणारा काटेरी हलव्याच्या दाण्यांचा उपयोग करून दागिने तयार केले जातात. प्रकार आणि आकार महिलांचे सर्व प्रकारचे दागिने बनविण्यात येतात त्यात गळ्यातला हार, मंगळसूत्र, कानातील डूल, हातातील बांगड्या, अंगठी ,ब्रासलेट, कंमरपट्टा, चाळ,बिंदी,वेणीला लावण्यात येणारी माळ, यासह इतर दागिन्यांचा समावेश आहे लहान मुलांसाठी गळ्यातील हार, हातातील ब्रेसलेट, कमरपट्टा, डोक्यावर लावण्यासाठी टोप, व मोरपीस आदी दागिने तयार करण्यात आले आहेत, संक्रांतीच्या महिनाभर आधीपासूनच नोंदणी केल्यानंतर हे दागिने तयार केले जात असल्याने दागिने बनविणाऱ्या कारागिरांनी सांगितले .किमती आवाक्यात हलव्याच्या दाण्यांचे भाव जसे असतात त्या पद्धतीने या दागिन्यांच्या किमती ठरविल्या जातात यंदा हलव्याचे दाणे महाग असल्याने दागिन्यांच्या किमती काही प्रमाणात स्थिर ठेवण्यात आले आहे. हलव्याचे दागिने स्थानिक स्तरावर पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत त्यामुळे रंगीत दाणे पुणे   इंदोर जळगाव या भागातून मागवावे लागतात. रंगीत दाण्यामध्ये लाल,   हिरवा, निळा, रंगाच्या दाण्यांची    मागणी अधिक असते. पांढरे दाणे स्थानिक स्तरावर उपलब्ध होतात त्यामुळे त्याच्या किमती कमी     असतात.  नववधूची  पहिली संक्रांत सासरी राहिल्यास तिला अशा दागिन्यांनी संक्रांतीला सजविले जाते शिवाय      काही महिला हौस म्हणून देखील संक्रांतीला दागिन्यांचा साज करीत असतात. महिलांप्रमाणेच आपल्या जीवनातील पहिली संक्रांत पाहणाऱ्या लहान बालकाला देखील         हलव्याच्या दाण्यांच्या दागिन्यांनी सजविले जाते. यंदाही त्याची क्रेझ कायम आहे.