शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरच्या १२ जणांना न्यायालयाचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 14:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊन सुरु असताना सोलापूर येथून नवापुरात आलेल्या १२ जणांसह बंदी असताना तंबाकूजन्य पदार्थ विक्री ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊन सुरु असताना सोलापूर येथून नवापुरात आलेल्या १२ जणांसह बंदी असताना तंबाकूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या एकास न्यायालयाने दंडाची शिक्षा सुनावली आहे़ निकालादरम्यान न्यायालयाने संसर्ग कालावधीत झालेले नियमांचे उल्लंघन हे गंभीर असून जास्तीत जास्त शिक्षद्वारे दंडनीय ठरवणे हे कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे़२ एप्रिल रोजी सोलापूर येथून वाहनाने ९ लोक व त्यांना आणणारे दोन असे १२ लोक जिल्ह्यात आले होते़ त्यांना गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत क्वारंटाईन कक्षात दाखल करण्यात आले होते़ यात शेख बिलाल शेख ईस्माईल, जुबेर मुसाजी गुला, हजला अफजल पठाण, खलील भुला मोहंमद, सिद्धीक फारुख पठाण, सुलामोद्दीन कुतुबोद्दीन बेलदार, अल्ताफ मुसाजी बारडोलीया सर्व रा़ नवापुर तसेच सादअली मोहम्मद हवेलीवाला, जावेद कमालोद्दीन तेली दोघे रा़ चिंचपाडा तसेच त्यांना वाहनाद्वारे जिल्ह्यात आणणारे जाहीर सय्यद व समीर शहा कलीम शहा दोघे रा़ नवापुर यांच्याविरोधात विविध कायद्यांतर्गत नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़त्यांच्याविरोधात नवापुर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आऱबी़ बहरीवाल यांच्या न्यायालयात सहायक पोलीस निरीक्षक डिगंबर शिंपी यांनी दोषोरोपत्र सादर केले होते़ न्यायालयात कोरोनाच गांभिर्य लक्षात घेत सर्व १२ जणांनी नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट करुन प्रत्येकी दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास पाच हजार रुपयांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली़ पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाठक यांनी काम पाहिले़सहायक पोलीस निरीक्षक शिंपी यांचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी कौतूक केले आहे़नंदुरबार शहरातील जळका बाजार भागात लॉकडाऊन काळात २३ एप्रिल रोजी तंबाखूजन्य विक्री प्रकरणी अनंत गोपाल जयस्वाल याच्यावर कारवाई करण्यात आली होती़ पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी त्याची चौकशी करुन घराची झडती घेतली असता घरात ५ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला होता़ अनंत जयस्वाल याच्याविरोधात गुन्हा दाखल होता़ त्याच्याविरोधात नंदुरबार प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी एऩबी़पाटील यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता़ तंबाकू विक्रीत दोषी आढळल्याने न्यायालयाने त्याना २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ न्यायालयात पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते़