शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यात आता कोरोनाचा एकच रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील एकमेव कोरोना रूग्ण आता जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असल्याने तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील एकमेव कोरोना रूग्ण आता जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असल्याने तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत आहे. असे असले तरी अजूनही कोरोनाचे संकट टळलेले नसल्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणेदेखील आवश्यक आहे.२१ एप्रिल रोजी शहाद्यात सर्वात प्रथम दोन कोरोना रूग्ण आढळल्याने शहर व तालुक्यात घबराट पसरली होती. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात बाधित रूग्णापैकी एका तरूणाचा मृत्यू झाल्याने तालुक्यात कोरोनाचे सावट पसरले. प्रशासनाने तातडीने पावले उचलत रूग्ण सापडलेला परिसर सीलबंद करून बाधीत रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांचाही शोध घेऊन तपासणी केल्याने २१ ते २५ एप्रिल दरम्यान एकूण नऊ रूग्ण आढळून आले. या सर्वांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाने सीलबंद परिसरात लोकांची तपासणी करून ज्या लोकांमध्ये कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आली, अशा नागरिकांना क्वॉरंटाईन करून त्यांचेवर लक्ष ठेवले.जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या आठ कोरोना बाधीतांपैकी टप्प्याटप्प्याने सात रूग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रूग्णालयातुन सोडण्यात आले. आता फक्त एका रूग्णावर उपचार सुरू असून, त्याच्या अहवालाची प्रशासनास प्रतिक्षा आहे. गेल्या १५-२० दिवसापासून तालुक्यात कोरोना रूग्ण न सापडल्याने तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे. तालुक्यात कोरोनाचा आलेख सपाट झाल्याने आणि आता एकमेव रूग्ण उपचार घेत असल्याने तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू झाली आहे.आरोग्य व स्वच्छेता विभाग, नगर पालिका प्रशासन, महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन या सर्वांचा यात मोलाचा वाटा आहे. प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील व पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे. याशिवाय नागरिकांनीदेखील लॉकडाऊनचे पालन केल्याने व योग्य खबरदारी घेतल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू शकला नाही. तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू असली तरी नागरिकांनी अजूनही सावधानता बाळगणे आवश्यक आहे. तालुक्यातील कोरोनाचा आलेख सपाट झाला असला तरी संकट अजून टळलेले नसल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. लवकरच पावसाळा सुरू होणार असल्याने आणि पावसाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढण्याची शक्यता असल्याने पाऊस सुरू होण्यापूर्वी कोरोनाची साखळी तुटणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पाळणे, घरात थांबणे, मास्क लावणे, स्वच्छता राखणे, आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक असल्याने प्रशासनाबरोबर नागरिकांनीदेखील कोरोना योद्धा म्हणून काम केले पाहिजे.