शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेक घेणाऱ्या कोरोनाचा जिल्ह्यात पुन्हा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 22:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ब्रेक घेणाऱ्या कोरोनाने पुन्हा उसळी घेतली असून एकाच दिवसात तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ब्रेक घेणाऱ्या कोरोनाने पुन्हा उसळी घेतली असून एकाच दिवसात तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ नंदुरबार शहरातील ५१ व ४८ वर्षीय पुरुष तर रनाळे येथील ३५ महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहेत़चार दिवसांपासून एकही रुग्ण आढळून न आल्याने जिल्ह्यात आलबेल स्थिती होती़ बाजारपेठाही पूर्ववत सुरु होवून अर्थचक्राला वेग आला होता़ दरम्यान मंगळवारी सायंकाळी शहरातील जामा मस्जिद परिसरात एकास कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती़ संबधिताने नाशिक येथील एका खाजगी लॅबमध्ये तपासणी केली होती़ याठिकाणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात माहिती देण्यात आली़ संबधित रुग्ण हा तिघांसह नाशिक येथे उपचारासाठी जात असल्याची माहिती समोर आली होती़ आरोग्य व महसूल विभागाने त्याच्यासोबत संपर्क केल्यानंतर तो परत आला आहे़ त्याला तातडीने आयसोलेशन वॉर्डात हलवण्यात आले असून त्याच्यासोबत असलेल्या तिघांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे़ दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता आणखी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे़ यातील एक जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी तर एक रनाळे ता़ नंदुरबार येथील महिला आहे़प्रशासनाकडून रनाळे आणि नंदुरबार शहरात बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे़ सायंकाळी पॉझिटिव्ह आलेला दुसरा रुग्णही मच्छीबाजार परिसरातील सार्वजनिक बांधकाम कार्यालय परिसरातील रहिवासी असून ते सध्या धुळे येथे उपचार घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ एकाच वेळी नंदुरबारात तीन रुग्ण आढळून येण्याची ही दुसरी वेळ आहे़ पोलीस प्रशासनाने मच्छीबाजार परिसर पूर्णपणे सील केला आहे़ तहसीलदार भाऊसाहेब थोरात व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या भागात भेटी दिल्या़ रात्री उशिरापर्यंत गटविकास अधिकारी अशोक पटाईत यांच्यासह तहसीलदार थोरात व पोलीस अधिकारी रनाळे येथे थांबून होते़ त्यांच्याकडून कंटेन्मेंट झाने तयार करुन ग्रामस्थांना माहिती देण्यात आली़

शहरातील मच्छी बाजार परिसरातील रहिवासी असलेल्या ५१ वर्षीय व्यक्तीला या भागात खानसामा म्हणून ओळखले जाते़ काही दिवसांपूर्वी संबधिताने शहरातील एका बड्या नगरसेवकाच्या घरगुती कार्यक्रमासाठी स्वयंपाक तयार केला होता़ हा कार्यक्रम एका फार्म हाऊसवर झाल्याचे बोलले जात आहे़ यावेळी शहरातील मान्यवरांसह अधिकाऱ्यांनी उपस्थिती दिल्याची चर्चा आहे़ संंबधिताला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शहरात या प्रकाराची चर्चा सुरु झाली आहे़ काही बडे अधिकारी कार्यक्रमात आमंत्रित असल्याची माहिती आहे़मच्छीबाजार परिसरात राहणाºया ५१ वर्षीय पुरुषा पाठोपाठ ४८ वर्षीय अधिकारीही याच परिसरातील सार्वजनिक बांधकाम कार्यालयातील आहेत़ ते सध्या धुळे येथे उपचार घेत असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे़ संबधित अधिकारी हे येथेच कर्तव्य बजावत असल्याने त्यांना उपचारांसाठी मंगळवारी रात्री उशिरा नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता आहे़

रनाळे येथील महिला क्वारंटाईन कक्षात असतानाही तिच्या संपर्कातील ९ जणांना तालुका प्रशासनाने क्वारंटाईन कक्षात रवाना केले आहे़ या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असला तरी तिच्या पतीचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहेत़ रनाळे गावात औषध फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला़

बांधकाम विभागातील अधिकारी पॉझिटिव्ह आल्यानेही एकच खळबळ उडाली होती़ जिल्ह्यात प्रथमच एखाद्या बड्या अधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार घडला आहे़ संबधित अधिकारी हे धुळे येथील रहिवासी असले तरी ते ड्यूटीसाठी सकाळपासून नंदुरबार येथे येतात़ त्यांचा या काळात अनेकांसोबत संपर्क आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे़ त्यांनी गेल्या काळात घेतलेल्या बैठका आणि भेटींचा आढावा प्रशासन घेत आहे़रनाळे ता़ नंदुरबार येथील ३५ वर्षीय कोरोनाबाधित महिला ही मुलूंड (मुंबई) येथून १० दिवसांपूर्वी कुटूंबासह परतली होती़ महिलेसह तिच्या कुटूंबाला दक्षता म्हणून होळ तर्फे हवेली शिवारातील कोरोना क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले होते़ दरम्यान संबधित महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला सायंकाळी आयसोलेशनमध्ये दाखल करण्यात आले आहे़