२४ ग्रामपंचायतींमध्ये अद्यापही कोरोनाचा मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST2021-06-19T04:21:09+5:302021-06-19T04:21:09+5:30

धडगाव तालुक्यात ३४ ग्रामपंचायतींमध्ये कोरोनाने शिरकाव केला होता. त्यातील सर्वच ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. आता एकही रुग्ण धडगाव तालुक्यात ...

Corona still resides in 24 gram panchayats | २४ ग्रामपंचायतींमध्ये अद्यापही कोरोनाचा मुक्काम

२४ ग्रामपंचायतींमध्ये अद्यापही कोरोनाचा मुक्काम

धडगाव तालुक्यात ३४ ग्रामपंचायतींमध्ये कोरोनाने शिरकाव केला होता. त्यातील सर्वच ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. आता एकही रुग्ण धडगाव तालुक्यात नाही.

अक्कलकुवा तालुक्यात ४७ ग्रामपंचायती कोरोनाबाधित होत्या. त्यापैकी ४६ कोरोनामुक्त झाल्या असून, अवघ्या एका ग्रामपंचायतीत एक रुग्ण कोरोनाबाधित आहे.

तळोदा तालुक्यातदेखील ५४ ग्रामपंचायती कोरोनाबाधित झाल्या होत्या. त्यातील ५३ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. आता केवळ एकच ग्रामपंचायत बाधित असून, त्यातही एकच रुग्ण आहे.

शहादा तालुक्यात ११४ ग्रामपंचायती कोरोनाबाधित झाल्या होत्या. त्यातील १०९ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. पाच ग्रामपंचायतींमध्ये केवळ १५ रुग्ण आहेत.

नवापूर तालुक्यात १०५ ग्रामपंचायती कोरोनाबाधित झाल्या होत्या. त्यातील ९७ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या असून, आठ ग्रामपंचायतींमध्ये १६ रुग्ण आहेत,

तर नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक १३५ ग्रामपंचायती कोरोनाबाधित झाल्या होत्या. त्यापैकी १२६ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. आता नऊ ग्रामपंचायतींमध्ये अवघे १४ रुग्ण आहेत.

एकूण २४ ग्रामपंचायतींमध्ये आता ४७ कोरोनाबाधित रुग्ण असून, लवकरच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे.

Web Title: Corona still resides in 24 gram panchayats