शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
3
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
4
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
5
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
6
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
7
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
8
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
9
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
10
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
11
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
12
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
13
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
14
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
15
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
16
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
17
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
18
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
19
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
20
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे

गुजरातमधून येणाऱ्या प्रवाशांची होणार कोरोना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 11:58 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यात रेल्वे व रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशाची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यात रेल्वे व रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशाची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहे.रेल्वे वाहतूक मार्गे येणाऱ्या राष्ट्रीय राजधानी दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यातून येणाऱ्या, थांबा असणाऱ्या रेल्वेतून नंदुरबार तसेच नवापूर रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांकडे आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह अहवाल सोबत असणे बंधनकारक राहील. ९६ तास आधी चाचणीचे नमुने घेणे आवश्यक असेल. नंदुरबार व नवापूर रेल्वे स्टेशनवर उतरणाऱ्या ज्या प्रवाशांकडे आरटीपीसीआर चाचणीचे निगेटीव्ह रिपोर्ट नसतील अशा प्रवाशांची तपासणी करण्यात यावी. दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा राज्यातून रस्ते मार्गे जिल्ह्यात येणाऱ्याची कोविड-१९ लक्षणे व शरीराचे तापमान तपासणी करण्यात यावी. ज्या प्रवाशांना लक्षणे नसतील अशाच प्रवाशांना जिल्ह्यात प्रवेश करण्यास मुभा असेल. लक्षणे आढळून आल्यास प्रवाशांना विलग करुन ॲन्टीजन चाचणी करण्यात येईल. अहवाल निगेटिव्ह आल्यास अशानाच पुढे प्रवास करण्यास मुभा असेल. रेल्वे व रस्ते मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना त्वरीत उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. होणारा खर्च प्रवाशांनी करावयाचा आहे.