शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात वाढतोय कोरोनाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:18 IST

तळोदा तालुक्यात २१ मार्च रोजी २५, २३ मार्च रोजी ३९, २४ मार्चला ४९, २६ मार्च रोजी ५१ जण पॉझिटिव्ह ...

तळोदा तालुक्यात २१ मार्च रोजी २५, २३ मार्च रोजी ३९, २४ मार्चला ४९, २६ मार्च रोजी ५१ जण पॉझिटिव्ह आले. त्यात रांझणी, खेडले, चिनोदा मोहिदा, बोरद या गावात कोरोना रुग्णांची संख्या अधिक झपाट्याने वाढत आहे. तळोदा तालुक्यातील रांझणी, खेडले, चिनोदा ही गावे कोरोनाची हॉटस्पॉट बनली आहेत. २२ मार्चपासून एकट्या खेडले गावात तब्बल ३७ तर रांझणीत ३५ रुग्ण आढळून आली आहेत. चिनोदा येथे सहा तर बोरदमध्ये तीन रुग्ण आढळून आले आहेत. २२ मार्च ते २६ मार्चदरम्यान तळोदा शहरात ७२ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागातील व तळोदा शहरातील कोरोना रुग्ण संख्या पाहता हे आकडे धडकी भरवणारे आहेत. कोरोना रोखण्यासाठी तळोदा शहरासह ग्रामीण भागात विविध उपाययोजनांवर स्थानिक ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे. काही गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तालुक्यातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून कोरोनाला हद्दपार करण्याची गरज आहे.

कोरोना बाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत ३ हजार ४१७ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. रॅपिड टेस्टमुळे कोरोना बाधित रुग्ण शोधून लक्षणे नसलेल्या रुग्णांना शासन नियमावलीनुसार कोविड सेंटर किंवा गृहविलगीकरण करून तत्काळ उपचार सुरू करण्यात येत आहे. तालुक्यात मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, वारंवार हात धुणे व विनाकारण गर्दीच्या ठिकाणी न जाणे आदींबाबतीत आरोग्य विभाग व नगरपालिकेमार्फत जनजागृती करण्यात येत आहे.

ग्रामीण भागात वाढत जाणारी कोरोना रुग्ण संख्या ही नागरिकांसह प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरली आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. मागील २५ दिवसांच्या कालावधीत कोरोना रुग्णांची संख्या २९६ च्यावर पोहोचली आहे. शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांवर आरोग्य यंत्रणेची नजर असून रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. शहरासह ग्रामीण भागातील रुग्णावर आरोग्य यंत्रणेची नजर असून रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.

- डॉ. महेंद्र चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी, तळोदा