शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना: दक्ष जनजीवन तेवढेच मंदावलेही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना व्हायरसचा महाराष्टÑातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनासह विविध घटकातून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहे. नंदुरबार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना व्हायरसचा महाराष्टÑातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनासह विविध घटकातून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहे. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळला नसला तरी गंभीर खबरदारी म्हणून प्रत्येक जिल्हावासीयाने या उपाययोजनांचा स्वीकार केला. शिवाय जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेने दिलेल्या दक्षतेच्या सूचनांचे तंतोतंत पालनही केले जात आहे. ही दक्षता पाळतांना जिल्ह्यातील बहुतांश नागरिक आवश्यकता भासली तरच घराबाहेर पडत आहे.महाराष्टÑात कोरोनाचा शिरकाव होताच नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक या आजाराबाबत गांभिर्याने दक्ष राहिला. शासनाकडून या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी नागरिकांसह विविध संस्था, समुदाय यांना काही सूचना केल्या. शासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांमुळे काही घटकांचे नुकसान होत असले तरी आजाराचे गांभिर्य लक्षात घेत प्रत्येक घटकांकडून प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले जात आहे. शाळा - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वार्षिक परिक्षा असल्या तरी सुट्या देण्यात आल्या. तर काही संस्थांनी कमी कालावधीतच परिक्षा आटोपून घेतल्या.जिल्ह्यात गरीब व सर्वसामान्य जनसमुदाय अधिक असून या समुदायाकडून सर्वाधिक खरेदी आठवडे बाजारातूनच करण्यात येत असल्याने त्यांचा संसार पर्यायाने जीवनच सर्वस्वी आठवडे बाजारावरच अवलंबून असते. परंतु जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार न भरवण्याचे आदेशही देण्यात आल्यामुळे या वर्गातील नागरिकांना अडचणी जाणवू लागल्या. असे असले तरी या जनसमुदायाने आव्हाने स्वीकारत आठवडे बाजारापासून यानिमित्त का असेना दुर राहणेच पसंत केले आहे.प्रतिबंधात्मक सूचना करतांना आरोग्य विभागामार्फत स्वच्छता राखण्याच्याही सूचना केल्या आहे. याही सूचनांचे पालन केले जात असून आरोग्याबाबत प्रत्येकाकडून चांगली काळजी घेतली जात आहे, ही काळजी घेतांना नागरिक अत्यावश्यक कामानिमित्तच घराबाहेर पडत आहे. त्यामुळे जवजीवन मंदावल्याचेच दिसून येत आहे. याचा अनुभव नंदुरबार येथील बाजारपेठेसह नवापूर, धडगाव, शहादा, तळोदा या ठिकाणी त्या-त्या तालुक्यातील नागरिकांना येत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर ही परिस्थिती येत्या काही दिवसात पुन्हा अधिक बिकट होतील असा अंदाज देखील तर्वविला जात आहे.प्रशासकीय पातळीवरील अत्यावश्यक कामांसाठीच कार्यालयात येण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. अन्य कामांसाठी प्रशासनाने हेल्पलाईन सुरू केली आहे. या माध्यमातून सेवा घेण्याचे आवाहन करीत काही घटक बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सेवांपैकी केवळ बॅँकेतील आर्थिक व्यवहार सुरु ठेवण्यात ठेवण्यात आले आहे. असे असले तरी बॅँकांमधील कामकाजही बंद होईल का? अशी भिती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. बॅँकेचे काममाज बंद झाल्यास कुठल्याच बॅँकांच्या एटीएमध्येही रोकड राहणार नाही. त्यातीलल रोकड सपल्यास जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना मोंया अडचणींचा सामना करावा लागेल, असेही म्हटले जात आहे.दुकानदारांकडून हॅण्डवॉशची सुविधानंदुरबार : कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून शहरातील काही व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानाच्या बाहेर ‘हॅण्डवॉश’ स्टेशनची सोय केली आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी शासन, प्रशासन पातळीवर प्रयत्न केले जात असताना आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने नंदुरबार शहरातील गणपती मंदिर परिसरातील कापड दुकानदार मुकेश दायमा व शैलेश जैन यांनी दुकानाच्या बाहेर तात्पुरत्या स्वरूपात ‘हॅण्डवॉश’ ची सुविधा केली आहे. नेहमीच गजबजणाºया गणपती मंदिर मार्गावर नेहमी नागरिकांची वर्दळ असते. या परिसरात कापड दुकाने, लहान-मोठी दुकाने व पुढे जातांना सराफ बाजार असल्याने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची नेहमी वर्दळ असते. कोरोनाचा संसर्ग ग्राहकांना होऊ नये यासाठी उपाय योजनेचा एक भाग म्हणून कापड व्यापारी मुकेश दायमा व शैलेश जैन यांनी ‘हॅण्डवॉश’ ची तात्पुरत्या स्वरूपात सोय केली आहे. दोघा कापड दुकानदार व्यवसायिकांचा उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.