शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल हॅकरकडून ‘कोरोना’चा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना व्हायरस आणि त्याची सर्वसामान्यांनी घेतलेली धास्ती याचा फायदा आता मोबाईल हॅकर घेवू लागले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना व्हायरस आणि त्याची सर्वसामान्यांनी घेतलेली धास्ती याचा फायदा आता मोबाईल हॅकर घेवू लागले आहेत. कोरोना व्हायरस मॅप हा मालवेअरच्या माध्यमातून लींक पाठवून मोबाईल डाटा चोरण्याचा प्रयत्न होत आहे. दरम्यान, सोशल मिडियाद्वारे कोरोनासंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरविल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षांनी दिला आहे.याबाबत जिल्हा पोलीस दलाने केलेल्या आवाहनानुसार, मोबाईल किंवा संगणकामध्ये लिंकच्या स्वरूपात पाठविण्यात आलेली कोरोना व्हायरस मॅप या लिंकला क्लिक किंवा ओपन करण्याचा प्रयत्न करू नये. सरळ अशी लिंक डिलेट करावी. कोरोना व्हायरसबाबत सोशल मिडियावर अफवा किंवा चुकीची माहिती प्रसारीत केल्यामुळे भारतासह राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येवून अफवा परसरविणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. समाजातील काही विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मुद्दाम सोशल मिडियाच्या माध्यमातून खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवून नागरिकांमध्ये भितीचे व दहशतीचे वातावरण निर्माण करीत आहे. त्यामुळे कोणीही सोशल मिडियावर कोरोना व्हायरसबाबत अफवा किंवा चुकीची माहिती प्रसारीत करू नये. जिल्ह्यातील अधिकृत नियंत्रण कक्षाकडूनच माहिती घ्यावी.जिल्हा सायबर सेलद्वारे जिल्ह्यातील सोशल मिडियाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. अफवा किंवा चुकीची माहिती प्रसारीत केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. चुकीची आणि नागरिकांमध्ये गोंधळ उडेल अशी माहिती कुणी प्रसारत करीत असेल तर जवळच्या पोलीस ठाण्यात संबधीताविरुद्ध तात्काळ तक्रार करावी. कोरोना संदर्भात अधिकृत माहिती व बातम्यांवरच विश्वास ठेवा असे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षकांतर्फे करण्यात आले आहे.