भाजीपाला तोलून मापून घेणा-या ग्राहकांची इंधन वितरणाबाबत अनास्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST2021-03-18T04:30:40+5:302021-03-18T04:30:40+5:30

नंदुरबार : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये झालेल्या दरवाढीमुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. यात पेट्रोलपंपांवर इंधन भरताना नागरीकांना काहीवेळा ...

Consumers who weigh and measure vegetables are indifferent about fuel distribution | भाजीपाला तोलून मापून घेणा-या ग्राहकांची इंधन वितरणाबाबत अनास्था

भाजीपाला तोलून मापून घेणा-या ग्राहकांची इंधन वितरणाबाबत अनास्था

नंदुरबार : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये झालेल्या दरवाढीमुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. यात पेट्रोलपंपांवर इंधन भरताना नागरीकांना काहीवेळा अडचणी येत आहेत. या अडचणी सोडवण्यासाठी वैधमापनशास्त्र विभाग असला तरी वर्षभरात शहरातील काय जिल्ह्यातील एकही पेट्रोलपंपाची तक्रार आलेली नसल्याची माहिती वैधमापन शास्त्र विभागाने दिली आहे.

जिल्ह्यातील इंधन दरांमध्ये वाढ होणे क्रमप्राप्त असताना अनेकवेळा मीटर काटा वेगाने धावणे, यासह किरकोळ कारणांवरुन प्रश्नोत्तरांची देवाण-घेवाण होते. परंतू तक्रारी मात्र करण्यात येत नाहीत. सध्या डिझेल व पेट्रोलचा खप हा अधिक असल्याने संबधित विभाग वेळोवेळी पेट्रोलपंपांना भेट देत माहिती घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान शहरातील सर्वच ठिकाणी योग्य पद्धतीने पेट्रोल व डिझेलचे वितरण होत असल्याचे पंपचालकांचे म्हणणे आहे.

नंदुरबार शहरात इंडियन ऑईल कार्पोरेशन, भारत पेट्रोलियम यासह विविध कंपन्यांचे पेट्रोलपंप आहेत. याठिकाणी ग्राहकांच्या सुरक्षेच्या सुविधा देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यातून ग्राहकांच्या तक्रारी येत नसल्याची माहिती आहे.

शहरातील काही पंपांना भेटी दिल्या असता, पेट्रोल किंवा डिझेल टाकण्यापूर्वी संबधित कर्मचारी शून्य पाहून घ्या असे ग्राहकाला सुचवत असल्याचे दिसून आले. हे सर्वच ग्राहकांसाठी सोयीचे असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

दैनंदिन पेट्रोल व डिझेलचे दर बदलत असल्याने तशी माहितीही फलकांवर लिहिली जाते आहे.

पंपावर डिझेल व पेट्रोल टाकताना घ्या काळजी

रिडिंग झिरो आहे हे आधी आधी पाहावे. तेल टाकत असताना काही हालचाली केले जात आहे का, हे पाहावे. तेल टाकत असताना लक्ष इतरत्र विचलित होवू देवू नये, काही शंका आल्यास प्रत्येक पंपावर पाच लीटरचे प्रमाणित माप उपलब्ध असते, त्याद्वारे खात्री करावी.

ग्राहकांच्या तक्रारी गेल्या वर्षात आलेल्या नाहीत. परंतू तक्रारी आल्यास त्याचा काही वेळात निपटारा केला जातो. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी योग्य पद्धतीने कामकाज सुरु आहे. नागरीकांना अडचणी असल्यास त्यांनी विभागाला संपर्क करावा.

-विनोद सभादिंडे,

वैधमापन निरीक्षक, नंदुरबार.

वर्षभरात वेळोवेळी होते पंपांची तपासणी

दरम्यान वर्षातून वेळोवेळी पेट्रोल व डिझेलपंपांना भेटी देत त्यांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती वैधमापनशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे. त्याचा अहवाल वरिष्ठांना दिला जातो.

Web Title: Consumers who weigh and measure vegetables are indifferent about fuel distribution