गावांच्या नामसाधर्म्यामुळे कोरोना रुग्णांबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:29 AM2021-01-22T04:29:10+5:302021-01-22T04:29:10+5:30

शहादा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य, महसूल, ग्रामपंचायत विभागाकडून संबंधित गावांना, व्यक्तींना वेळोवेळी सूचना ...

Confusion about Corona patients due to village nomenclature | गावांच्या नामसाधर्म्यामुळे कोरोना रुग्णांबाबत संभ्रम

गावांच्या नामसाधर्म्यामुळे कोरोना रुग्णांबाबत संभ्रम

Next

शहादा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य, महसूल, ग्रामपंचायत विभागाकडून संबंधित गावांना, व्यक्तींना वेळोवेळी सूचना देऊन परिस्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु तालुक्यात काही गावांच्या नावांमध्ये साम्य असले तरी त्या गावाबाबत गोंधळ होऊ नये म्हणून संबंधित गावांच्या नावापुढे त.सा., त.ह., त.त. अशी वेगवेगळी विशेषणे लावली आहेत. त्यात आरोग्य विभागाने बामखेडा त.सा. येथे कॅम्प घेऊन नागरिकांची तपासणी केली असता त्यात बहुतांश नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. परंतु सोशल मीडियावर गावांच्या नावांची यादी प्रसिद्ध होत आहे त्यात बामखेडा असा उल्लेख असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. संबंधित रुग्णांनी कोरोना तपासणी करताना गावाचा पत्ता व्यवस्थित द्यावा जेणेकरून प्रशासनात गोंधळ होणार नाही. एकाच नावाची तालुक्यात दोन गावे असल्याने साहजिकच संभ्रम होत असल्याने प्रशासनाचाही गोंधळ निर्माण होतो. सारख्या नावाच्या गावांची यादी प्रसिद्ध करताना गावाच्या नावापुढे असलेले त.सा., त.ह., त.त. आदी विशेषणे लावल्यास ग्रामस्थांचा व प्रशासनाचा संभ्रम दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Confusion about Corona patients due to village nomenclature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.