स्काऊट राज्य पुरस्कार परीक्षेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:45 IST2021-02-26T04:45:05+5:302021-02-26T04:45:05+5:30

शिबीर प्रमुख म्हणून नवनाथ वाघचौरे (नाशिक) यांनी तर परीक्षक म्हणून संकेत माळी, हिरालाल पाटील, नरेंद्र पाटील, ज्ञानेश्वर सावंत, शिंदे ...

Concluding Scout State Awards Exam | स्काऊट राज्य पुरस्कार परीक्षेचा समारोप

स्काऊट राज्य पुरस्कार परीक्षेचा समारोप

शिबीर प्रमुख म्हणून नवनाथ वाघचौरे (नाशिक) यांनी तर परीक्षक म्हणून संकेत माळी, हिरालाल पाटील, नरेंद्र पाटील, ज्ञानेश्वर सावंत, शिंदे यांनी काम पाहिले. या चार दिवसात लेखी, प्रात्यक्षिक व तोंडी स्वरूपात परीक्षा घेण्यात आली.

समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम उपस्थित होते. या वेळी कदम म्हणाले की, स्काऊट चळवळ ही शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे देते. शाळेत स्काऊट आणि गाईड चळवळ राबवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास चळवळीतून होतो. सोबतच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षाही द्याव्यात. नियोजन सुंदर असेल तर पुढील काम सोपे होते म्हणून अभ्यासासाठी नियोजन करा व आलेल्या संकटांना सामोरे जा, असे त्यांनी सांगितले. यशवंत पाटील, शिक्षक व विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील, हेमंत पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कविता वाघ यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर सावंत यांनी तर आभार आभार नरेंद्र गुरव यांनी मानले.

Web Title: Concluding Scout State Awards Exam