शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

शहादा येथे बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST

दिवसोंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. यापूर्वी कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर संपूर्ण ...

दिवसोंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. यापूर्वी कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर संपूर्ण परिसरात विशेष खबरदारी प्रशासनातर्फे बाळगली जात होती. मात्र, मार्च महिन्यात बाधितांचा वेग वाढला असला तरी प्रशासनाच्या उपाययोजना कमी पडत असल्याने बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. प्रशासनातर्फे चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असली तरी ज्या रुग्णांनी तपासणीसाठी स्वॅबचे नमुने दिले आहेत अथवा ज्यांच्या तपासणीचा रिपोर्ट येणे बाकी आहे अशा रुग्णांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवणे गरजेचे असतानाही तेथे ठेवले जात नसल्याने असे संभावित संशयित रुग्ण दिवसभर गावात फिरत आहेत. परिणामी ते अनेकांच्या संपर्कात येत असल्याने कोरोनाचा फैलाव वाढत आहे, तर दुसरीकडे ज्यांना होम क्वारंटाइन म्हणून उपचाराच्या सुविधा दिल्या असल्या तरी अशांतर्फे विशेष खबरदारी बाळगली जात नाही व यावर प्रशासनाचे पाहिजे तेवढे लक्ष नसल्याने सर्वत्र गोंधळ निर्माण झाला आहे.

शहरासह तालुक्यात कमालीची बाधितांची संख्या वाढत असल्याने शहरातील सर्व हॉस्पिटल हाऊसफुल झाले आहेत. हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी दाखल करावे कुठे, असा प्रश्न नातेवाइकांसमोर निर्माण झाला आहे. दुसरीकडे अनेक बाधित रुग्ण उपचारासाठी गुजरात राज्यातील सुरत येथे जात असून, सुरतच्या अनेक हॉस्पिटलमध्ये शहाद्यातील असंख्य रुग्ण उपचार घेत आहेत. अशा उपचार घेत असलेल्यांची नोंद प्रशासनाकडे नाही, परिणामी या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी झालेली नाही यामुळेही संक्रमण वाढत असल्याचे बोलले जात आहे.