शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १ ते १५ एप्रिलदरम्यान संपूर्ण लॉकडाऊन- जिल्हाधिकारी यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST

सर्व बाजारपेठा, आठवडीबाजार, इतर अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने, शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स, बार्बर शॉप, स्पा, सलून, ब्युटीपार्लर बंद राहतील. ...

सर्व बाजारपेठा, आठवडीबाजार, इतर अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने, शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स, बार्बर शॉप, स्पा, सलून, ब्युटीपार्लर बंद राहतील. करमणूक उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, प्रेक्षकगृहे, क्रीडासंकुले, मंगल कार्यालये, खुले लॉन्स, सभागृह, असेम्ब्ली हॉल बंद राहतील. सर्व हॉटेल / रेस्टॉरंट, लॉजिंग, परमिट रूम बीअर बार व इतर सर्व प्रकारच्या आस्थापना बंद राहतील.

सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने व इतर सर्व गर्दी होणारे कार्यक्रम बंद राहतील. धार्मिक व प्रार्थनास्थळे सर्वसामान्यांसाठी बंद राहतील. तथापि, धर्मगुरू, पुजारी यांना नित्यनेमाचे धार्मिक कार्यक्रम करता येतील. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून औषधाची दुकाने, रुग्णालये पूर्णवेळ सुरू राहतील. भाजीमंडई सकाळी ६ ते ११ या वेळेत सुरू राहील. मात्र, एकाआड एक ओटे राहतील. भाजीपाला आणि किराणा वस्तूंच्या घरपोच सेवेला प्राधान्य देण्यात यावे. दूध वितरकांना सकाळी ७ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत दूध वितरणास परवानगी असेल. दूध वितरकांनी संबंधित तहसीलदार यांच्याकडून ओळखपत्र घेणे आवश्यक आहे.

वृत्तपत्र कार्यालये आणि वृत्तपत्र छपाई व वितरणास अनुमती असेल. किराणा आस्थापना सकाळी ६ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी राहील. पाचपेक्षा अधिक व्यक्ती दुकानात आढळल्यास दंडात्मक कारवाई करून दुकान सील केले जाईल. दुकानाच्या समोरील बाजूस ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ असा फलक लावावा व सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी खुणा कराव्यात. सर्व प्रकारची मालवाहतूक व अत्यावश्यक सेवेसाठी गॅरेज सुरू ठेवण्यास परवानगी असेल.

गॅस वितरण पूर्णवेळ सुरू राहील. पेट्रोलपंप केवळ अत्यावश्यक सेवा व शासकीय वाहनांसाठी सुरू राहतील. यासाठी आवश्यक पुरावा संबंधिताने वितरकास दाखविणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व मान्यताप्राप्त विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी संबंधित परीक्षा केंद्र, नियुक्त अधिकारी, कर्मचारी, यंत्रणा यांना परीक्षा कामकाजासाठी मुभा राहील. परीक्षार्थ्यांनादेखील मुभा राहील. तथापि, त्यांनी ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे.

अंत्यविधीसाठी २० पेक्षा अधिक व्यक्तींना अनुमती असणार नाही. सर्व शासकीय कार्यालये, बँका शासकीय वेळेत सुरू राहतील. पोलीस, होमगार्ड, जिल्हा सूचना केंद्र, महावितरण, सशस्त्र दले, अग्निशमन दल, शासकीय धान्य गोदाम, कारागृहे, म्युनिसिपल सेवा कोणत्याही बंधनाशिवाय सुरू राहील. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोबत ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे. याशिवाय, शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लागू राहतील.