शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

आगारात बसेसच्या स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बसस्थानकात बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून कोरोनाची लागण होऊ नये यासाठी नंदुरबार आगाराकडून बसेसची स्वच्छता ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बसस्थानकात बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून कोरोनाची लागण होऊ नये यासाठी नंदुरबार आगाराकडून बसेसची स्वच्छता करण्यासह सॅॅनेटायझरचा वापर करण्यात येत आहे़ यातून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु आहे़कोरोनाचा परिणाम दैनंदिन सार्वजनिक व्यवस्थेवरती परिणाम झाला असून नंदुरबार बसस्थानकावर प्रवाशांची तुरळक गर्दी आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आगारातर्फे सर्व बसेस दररोज आतून-बाहेरून स्वच्छ धुण्यावर भर दिला जात आहे. स्वच्छतेसाठी कार्यशाळेतील महिला आणि पुरुष सफाई कामगार यांची नियु्क्ती करण्यात आली आहे़ त्यांच्याकडून फवारणी मशीनच्या टाकीत डेटॉल आणि वॉशिंग पावडर टाकून त्या पाण्याने बसेसची स्वच्छता केली जात असल्याची माहिती आगार प्रमुख मनोज पवार यांनी दिली. जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय बंद झाल्याने तसेच शासकीय कामानिमित्त नागरिकही येत नसल्याने आगाराच्या उत्पन्नावर परिणाम जाणवत आहे़दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून नंदुरबार आगारातून पुणे आणि मुंबई दोन्ही बसेस सध्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामीण भागातील मुक्कामी फेºया आणि मानव विकास अंतर्गत होणाºया २४० शालेय फेºया थांबविण्यात आले आहेत. वाहक चालक आणि एसटी कर्मचाऱ्यांना धुळे विभागाकडून मास्क आणि सनेटाइजरचे बुधवारपासून वाटप करण्यात येणार आहे़ याबाबत आगार प्रमुख मनोज पवार यांनी एसटीच्या स्वच्छतेसह कर्मचाºयांसाठी सुविधा देण्यावर भर देत असल्याची माहिती दिली आहे़