शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

शहरी भागात एक दिवसाआड भरतील वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्यात येत असून त्यासाठी शाळांनी तयारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्यात येत असून त्यासाठी शाळांनी तयारी सुरू केली आहे. ज्या शाळांमध्ये एका वर्गात ४० पेक्षा अधीक विद्यार्थी आहेत अशा शाळांनी एक दिवसाआड संबधीत वर्ग भरविण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या व्हॅाट्‌सअप गृपवर आवश्यक त्या सुचना देखील देण्यात येत आहेत. दरम्यान, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत असून त्यासाठी तालुका स्तरावर स्वॅब संकलन करण्यात येत आहे. नववी ते १२ वीचे वर्ग यशस्वीरित्या सुरू झाल्यानंतर आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शाळा २७ जानेवारीपासून हे वर्ग सुरू करणार आहेत. तशा आवश्यक सुचना शिक्षण विभागातर्फे शाळांना देण्यात आल्या आहेत. शाळांची होणार कसरतज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त आहे अशा शाळांची मात्र मोठी कसरत होणार आहे. शहरी भागातील शाळांमध्येच ही समस्या जास्त प्रमाणात राहणार आहे. शहरी भागात एका वर्गात किमान ५० ते जास्तीत जास्त ७५ विद्यार्थी असतात. अशा वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने बसविले जाईल, सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल का? एका वर्गात किमान ४० ते ४५ विद्यार्थी बसविण्याचे ठरविले तर एका वर्गाचे दोन हॅालमध्ये विभागणी करावी लागणार आहे. अशा वेळी शिक्षकांची मात्र कसरत होणार आहे. एक दिवसाआड वर्गजास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांनी एक दिवसाआड वर्ग भरविण्याचे नियोजन केेले आहे. अर्थात पाचवी, सातवी व नववीचे वर्ग सोमवार, बुधवार, शुक्रवारी  भरतील तर सहावी, आठवी व दहावीचे वर्ग मंगळवार, गुरुवार व शनिवारी भरतील अशा प्रकारे एक दिवसाआड वर्ग भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गणवेश, शालेय साहित्य खरेदीपाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार असल्याने आता विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य खरेदी करावी लागणार आहे. त्यासाठी पालकांना सुचना देण्यात आल्या आहेत. शाळांनी सुचना देतांना विद्यार्थ्यांनी शालेय गणवेशातच यावे अशा सुचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आता पालकांना त्यासाठी खर्च करावा लागणार आहे. याशिवाय शालेय साहित्य देखील खरेदी करावे लागणार आहे. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या शालेय बस आणि रिक्षा देखील लावाव्या लागणार आहेत. 

स्वॅब देण्यासाठी शिक्षकांची होतेय गर्दी...पाचवी ते आठवीला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार शिक्षकांची स्वॅब संकलन केंद्रावर गर्दी होत आहे. तीन हजार २२४ शिक्षक व एक हजार ४६५ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करावी लागणार आहे. तसे पत्र त्यांना शाळेकडे द्यावे लागणार आहे. 

शहरी भागातील अधीक विद्यार्थीजिल्ह्यातील २८४ माध्यमिक शाळा सुरू होणार आहेत. त्यातील सर्वाधिक शाळा या शहरी भागातील आहेत. ग्रामिण भागात देखील शाळांची संख्या सर्वाधिक आहे. पाचवी ते आठवीचे सुमारे ८० हजार विद्यार्थी आहेत. 

पालकांनी पाल्यांना शाळेत पाठवावे...शांळांमध्ये कोरोनाविषयीच्या आवश्यक त्या उपाययोजना राहणार आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवावे. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये अशी अपेक्षा शिक्षण विभागातर्फे व्यक्त होत आहे. 

पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन पुर्ण झाले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कोरोना चाचण्याही सुरू करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये आवश्यक ती सर्व उपाययोजना केली जात आहे. -एम.व्ही.कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी.