चौपाळे ते आशा पायी दिंडीही कोरोनामुळे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:32 IST2020-03-21T11:32:27+5:302020-03-21T11:32:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील शेकडो भाविकांचा सहभाग असलेल्या आशा ते चौपाळे ही पायी दिंडी रद्द करण्यात आली ...

Choupale canceled because of coroner Dindhi Dindhi | चौपाळे ते आशा पायी दिंडीही कोरोनामुळे रद्द

चौपाळे ते आशा पायी दिंडीही कोरोनामुळे रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील शेकडो भाविकांचा सहभाग असलेल्या आशा ते चौपाळे ही पायी दिंडी रद्द करण्यात आली आहे़ येत्या २९ रोजी ही दिंडी गुजरात राज्यातील आशा येथे रवाना होणार होती़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून आयोजकांकडून दिंडी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला़
संत दगा महाराज यांच्या भक्त गणांकडून त्यांचे समाधीस्थळ आशा (गुजरात) पर्यंत २६ वर्षांपासून पायी दिंडी काढण्याची परंपरा आहे़ यात जिल्ह्यासह गुजरात व मध्यप्रदेशातील शेकडो महिला व पुरुष भाविक सहभागी होतात़ त्यांच्याकडून हरीनामाचा गजर करत तब्बल सात दिवस पायी प्रवास करण्यात येतो़ यंदाही २९ मार्च रोजी स्वर्गीय संत रामचैतन्य बापू यांचे शिष्य संतोष चैतन्य महाराज यांच्या मार्गदर्शनात ही दिंडी निघणार होती़ यानिमित्त नंदुरबार तसेच दिंडीच्या मार्गावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़ हि दिंडी ७ एप्रिल रोजी आशा येथे पोहोचणार होती़ याठिकाणी आत्मज्योत विसर्जन आणि पादुका पूजनानंतर दिंडीचा समारोप करण्याची परंपरा आहे़
२६ वर्षे पूर्ण केलेल्या या दिंडीचे यंदाचे २७ वे वर्ष आहे़ २६ वर्ष अविरत सुरु असलेली ही धार्मिक परंपरा यंदा खंडीत झाल्याने भाविकांनी नाराजीही व्यक्त केली आहे़ परंतू राष्ट्रीय योगदान म्हणून घेतलेल्या या निर्णयाचे समर्थन करुन धार्मिक कार्यक्रमात सहभाग कायम राहणार आहे़

Web Title: Choupale canceled because of coroner Dindhi Dindhi