शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर मुख्याधिकारी राहूल वाघ करणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST

भाजी मंडीत पालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून नवीन सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र, व्यावसायिकांकडून या भागात कचरा व ...

भाजी मंडीत पालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून नवीन सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र, व्यावसायिकांकडून या भागात कचरा व खराब भाजीपाला टाकण्यात येत असल्याने कचऱ्याचे ढीग तयार होत आहेत. त्यामुळे या भागात वराह व मोकाट गुरांचा वावर वाढला असून, दुर्गंधी पसरत आहे. नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरात पालिकेच्यावतीने व्यापारी संकुलाचे बांधकाम करण्यात येत असून, याठिकाणी कचरा टाकण्यात येत आहे. के. स. मार्केट भागातील स्वच्छतागृहाजवळ उघड्यावरच कचरा टाकण्यात येत आहे. पशुवैद्यकीय दवाखाना, खासदार निधीतून खेळाडूंसाठी क्रीडा भवन बांधण्यात आले असून, अनेक वर्षांपासून बंद असल्याने त्याच्या मुख्य प्रवेशद्वारातच कचरा टाकण्यात येतो आहे.

शहरातील जनता चौक, भाजी मंडई, नगरपालिका परिसर, नगरपालिका शाळा परिसर आदी भागांमध्ये पालिकेने लाखो रुपये खर्चून कचरा संकलनासाठी घंटागाड्यांची सोय केली आहे. तसेच काही मुख्य चौकात ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. तरीही व्यावसायिक उघड्यावरच कचरा टाकत असल्याने दुर्गंधी पसरत असून, परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरामध्ये विविध प्रकारच्या मालाची वाहतूक करण्यात येते. या वाहनातून वन विभाग कार्यालय, नगरपालिका शाळा, जनता चौक या भागात सामान उतरल्यानंतर वाहनातील कचरा रस्त्यावर टाकला जातो. पालिकेच्या स्वच्छता पथकाने कचरा टाकणाऱ्याचा शोध घेऊन त्यांचे फोटो काढून कायदेशीर कारवाई केल्यास हा प्रश्न मार्गी लागू शकतो.

शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणात यावर्षीही नंबर मिळावा, यासाठी पालिकेची टीम मेहनत घेत असून, घंटागाड्यांची सोय करण्यात आली आहे. तसेच कचराकुंड्या असूनही काही व्यावसायिक रस्त्यांवर कचरा टाकत असल्याचे निदर्शनात आले आहे. अशांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

- राहुल वाघ, नगरपालिका मुख्याधिकारी, शहादा

नगरपालिका, जनता चौक आदी परिसरातील मुख्य रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांची माहिती पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने घेण्यात येत आहे. शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

- राजेंद्र चव्हाण, स्वच्छता निरीक्षक, शहादा