मुख्यमंत्री दोन दिवसात जिल्ह्यात येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 11:57 IST2021-03-18T11:57:46+5:302021-03-18T11:57:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील पर्यायाने जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येत्या दोन ...

The Chief Minister is likely to arrive in the district in two days | मुख्यमंत्री दोन दिवसात जिल्ह्यात येण्याची शक्यता

मुख्यमंत्री दोन दिवसात जिल्ह्यात येण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुर्गम भागातील पर्यायाने जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येत्या दोन दिवसात धडगाव  आणि मोलगी येथे येणार असल्याची माहिती देण्यात आले आहे. प्रशासनाकडून बुधवारी सायंकाळी याबाबत धडगाव व अक्कलकुवा तहसील कार्यालयात पत्रव्यवहार करत माहिती दिली होती. 
या पार्श्वभूमीवर धडगाव आणि मोलगी ता. अक्कलकुवा येथे मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. धडगाव येथे हेलिपॅड तयार करण्यास सुरुवात झाली आहे. शासकीय विश्रामगृहात आवश्यक त्या सुविधा पुरविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. बुधवारी जिल्हाधिकारी डॅा.राजेंद्र भारूड यांनी धडगाव येथे तातडीने भेट दिली. जिल्हाधिकारी कार्यालय व आरोग्य विभागातर्फे आवश्यक त्या माहितीचे संकलन करून अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाकडून दौऱ्याचे संकेत मिळाले असून अधिकृत दौरा अद्याप आलेला नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

 

Web Title: The Chief Minister is likely to arrive in the district in two days