शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी जनतेला लसीकरणाबाबत दिला विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:29 IST

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ग्रामीण रुग्णालय परिसरात मांडण्यात आलेल्या रानभाज्यांची आणि सातपुड्यातील पारंपरिक पिकांची माहिती घेतली. त्यांनी रानभाज्या पिकविणाऱ्या ...

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ग्रामीण रुग्णालय परिसरात मांडण्यात आलेल्या रानभाज्यांची आणि सातपुड्यातील पारंपरिक पिकांची माहिती घेतली. त्यांनी रानभाज्या पिकविणाऱ्या आदिवासी बांधवांशी संवाद साधला आणि पारंपरिक वाणाचे संवर्धन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. रानभाज्यांना बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

तोरणमाळ विद्युत उपकेंद्रासाठी सहकार्य करणार

मुख्यमंत्री ठाकरे यांनी धडगाव तालुक्यातील सुरवाणी येथील विद्युत उपकेंद्राच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. त्यांनी कामाबाबत समाधान व्यक्त केले आणि उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. काम पूर्ण करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. दुर्गम भागातील विजेची समस्या दूर करण्यासाठी तोरणमाळ येथील विद्युत उपकेंद्रासाठी १६ कोटींचा प्रस्ताव पाठविल्यास त्यासाठी देखील सहकार्य करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

हे उपकेंद्र पूर्णत्वास आल्यास अक्राणी, अक्कलकुवा व परिसरातील २०० गावे व साधारण ११ हजार ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. या उपकेंद्रातून ३३ के.व्ही. दाबाने धडगाव, हातधुई, मोलगी, जमाना, काकरदा, पिंपळखुटा या गावाना वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत अक्राणी व अक्कलकुवा तालुक्यातील २२० गावांना शहादा उपकेंद्रातून वीजपुरवठा होत आहे. या उपकेंद्रामुळे ३३ के.व्ही. वाहिनीची लांबी कमी होणार असून, त्यामुळे या भागातील भविष्यात येणारी विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी हे केंद्र महत्वपूर्ण ठरणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.