शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाकडून जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST

नंदुरबार : केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. रेमडेसिवीरच्या वापराबाबत डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यात यावे ...

नंदुरबार : केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. रेमडेसिवीरच्या वापराबाबत डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यात यावे आणि रुग्णांना गरज असेल तेव्हाच या औषधाचा वापर करण्याच्या सूचना पथकातील सदस्यांनी दिल्या.

पथकात एनसीडीसीचे सहसंचालक डॉ.संकेत कुलकर्णी आणि सहायक प्राध्यापक डॉ.सौरभ मित्रा यांचा समावेश होता. बैठकीस खासदार डॉ.हीना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, शाहूराज मोरे, महेश सुधाळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते.

कोरोना चाचणी लॅब २४ सुरू ठेवण्यासाठी खाजगी तंत्रज्ञांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात याव्यात. अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर एका ठिकाणी उपचार करावा. कोरोना बाधित व्यक्तींच्या संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, अशा सूचना पथकातील सदस्यांनी केल्या.

डॉ.भारुड यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी दिली. नवीन रुग्णवाहिकाचा रॅपिड अँटीजन चाचणीसाठी आणि कोराना बाधितांना रुग्णालयात नेण्यासाठी उपयोग होईल. रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.