केंद्र सुरू; परंतु कर्मचारी नसल्याने लसीकरणच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:31 IST2021-04-22T04:31:47+5:302021-04-22T04:31:47+5:30

नंदुरबार : पालिकेतर्फे चार ठिकाणी लसीकरण केंद्रे दोन दिवसांपासून सुरू करण्यात आली; परंतु त्या ठिकाणी आवश्यक कर्मचारी नसल्याने लसीकरण ...

Center start; But there is no vaccination due to lack of staff | केंद्र सुरू; परंतु कर्मचारी नसल्याने लसीकरणच नाही

केंद्र सुरू; परंतु कर्मचारी नसल्याने लसीकरणच नाही

नंदुरबार : पालिकेतर्फे चार ठिकाणी लसीकरण केंद्रे दोन दिवसांपासून सुरू करण्यात आली; परंतु त्या ठिकाणी आवश्यक कर्मचारी नसल्याने लसीकरण सुरू झाले नसल्याची स्थिती आहे.

लसीकरण केंद्रांत गर्दी होऊ नये यासाठी शहरात चार ठिकाणी नव्याने लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. त्यात टिळक रोडवरील पालिका शाळा क्रमांक दहामध्ये देखील लसीकरण केंद्र दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत; परंतु लस देण्यासाठी कर्मचारीच नसल्यामुळे दोन दिवसांपासून एकही लस येथे दिली गेली नाही. नागरिक लसीकरणासाठी येऊन फिरून जात आहेत. अखेर बुधवारी दुपारी कर्मचाऱ्यांनी फलक लावून गुरुवार, २२ एप्रिलपासून लसीकरण सुरू होणार असल्याचे त्यावर नमूद करण्यात आले. या प्रकारामुळे पालिकेतील विरोधी गटनेते चारुदत्त कळवणकर यांनी नाराजी व्यक्त करीत तातडीने लसीकरण सुरू करावे, अशी मागणी केली आहे.

Web Title: Center start; But there is no vaccination due to lack of staff