दुर्गम भागातही कारोनाबाबत खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:49 IST2020-03-21T11:48:52+5:302020-03-21T11:49:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धडगाव तालुका प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपययोजना आखण्यात येत आहे. तालुका आपत्ती व्यवस्थापन ...

Caution about business in remote areas | दुर्गम भागातही कारोनाबाबत खबरदारी

दुर्गम भागातही कारोनाबाबत खबरदारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धडगाव तालुका प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपययोजना आखण्यात येत आहे. तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेत अनेक कोरोनावर मात करण्यासाठी ठिकठिकाणी प्रवाशांची तपासणी देखील करण्यात येत आहे.
यानिमित्त घेण्यात आलेल्या बैठकीत तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, पोलीस निरीक्षक एस.डी.गवळी, तालुका वैद्यकीय अधिकारी दिनेश बढे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष परमार यांच्यासह राज्य परिवहन महामंडळाचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
या बैठकीत राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव टाळण्यासाठी धडगाव तालुक्यातील सर्वच यंत्रणांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यात महसुल, आरोग्य, पोलीस प्रशासन शिक्षण विभाग व एस.टी.महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. या उपायोजनांतर्गत धडगाव येथील उदय नदीजवळ शहादाकडून येणाऱ्या प्रत्येक बसेसमधील प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. तर तोरणमाळकडे जाणºया वाहनांमधील प्रवाशांची लेगापाणी ता. धडगाव येथे आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात येत आहे. धडगाव येथील तपासणी पथकात डॉ. आश्विनी शिंदे, डॉ.पन्नालाल पावरा, आरोग्य सेवक सुर्यवंशी, गणेश अहिरे, परिचारिका शिंदे, तर लेगापाणी येथी तपासणीसाठी डॉ. गिरासे व डॉ.रावले यांचे पथक कार्यान्वित आहे.

दुर्गम भागात होणाºया प्रवासी वाहतुक सेवेत खाजगी सेवा आघाडीवर आहे. परंतु जिपगाड्यांच्या टपावर व आजूबाजूला प्रवासी लटकवून प्रवासी वाहतुक होत असल्याने ही सेवा धोक्याची ठरते. यानिमित्त घेण्यात आलेल्या बैठकीत अशी वाहतुक पूर्णत: बंद करण्यात आली.

धडगाव येथे सोमवारी भरणारा आठवडे बाजार बंद करण्यात आला असून कुठल्याही व्यापाºयाने बाजारासाठी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Caution about business in remote areas