शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट फिरणाऱ्या गुरे व वराहांमुळे वाहतुकीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:48 IST

या संदर्भात आता पोलिसांनी जरी गांभीर्याने घेतले असले तरी मुख्यतः ही जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. शहरातील स्वच्छतेचा लाखोे रुपयांचा ...

या संदर्भात आता पोलिसांनी जरी गांभीर्याने घेतले असले तरी मुख्यतः ही जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. शहरातील स्वच्छतेचा लाखोे रुपयांचा ठेका दरवर्षी खासगी कंपन्यांना पालिकेमार्फत दिला जातो. त्यात शहरातील नागरिकांच्या घरातील कचरा गोळा करणे व संपूर्ण शहराला कचरामुक्त ठेवणे ही जबाबदारी असते, मात्र ठेकेदाराकडून असे न होता फक्त वरवर साफसफाई दाखवून घनकचऱ्याच्या नावाने लाखोंचा मलिदा राजरोसपणे रीतसर लाटला जात आहे. तसेच गल्लोगल्ली, रस्त्यांवर, गटारीत व्यापाऱ्यांकडून टाकलेला कचरा, चौकाचौकात अस्तव्यस्त पडलेला कचराच मोकाट गुरांना, वराहांना व बेवारस कुत्र्यांना आमंत्रित करीत असतो. तेथेच जे मिळेल ते खाऊन निर्धास्तपणे शहरभरात हिंडत असतात तर काही शहरातील मुख्य रस्त्यांसह अनेक वसाहतींच्या रस्त्यांवर ठाण मांडून बसतात तर कधी रस्त्यांवर झुंज होते. यामुळे अनेक वाहनधारकांचा, पायी चालणाऱ्या नागरिकांचा अपघात होतो. मात्र या मुक्या बेवारस फिरणाऱ्या गुरांचे, वराहांचे, मोकाट कुत्र्यांचे करणार तरी काय, यांच्याविरोधात तक्रार देणार काय, असा गंभीर प्रश्न उपस्थित होतो. परंतु यांचे मालक त्यांच्यापासून मिळणारे उत्पन्न घेऊन निर्धास्तपणे यांच्यासारखेच मोकाट फिरतात. खरेतर त्यांची पालिकेने धरपकड करून त्यांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे व मालक न सापडल्यास त्या गुरांची रवानगी कायदेशीरपणे गोशाळेत केली पाहिजे. मात्र, पालिका प्रशासनालाही याचे काहीही सोयरसुतक दिसत नाहीसा. मात्र, आत्ता शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी सोमवारी सोशल मीडियावर मोकाट फिरणारे गुरे व वराहांच्या संदर्भात नागरिकांना तक्रार देण्यासह त्यांच्या मालकांवर कठोर कारवाई करण्याची पोस्ट व्हायरल करून त्यांचा बंदोबस्त करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. यात पालिका प्रशासन काय भूमिका निभावते ते येणारा काळच ठरवेल.