शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

एका बाजूला काेरोनाची चाचणी अन् दुसऱ्या बाजूला होतेय लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:18 IST

नंदुरबार : कोरोना महामारीमुळे जिल्हा रुग्णालयाला कोविड हाॅस्पिटलचा दर्जा मिळाला आहे. यातून येथील सुविधा दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान, काही ...

नंदुरबार : कोरोना महामारीमुळे जिल्हा रुग्णालयाला कोविड हाॅस्पिटलचा दर्जा मिळाला आहे. यातून येथील सुविधा दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान, काही ठिकाणी मात्र असुविधा असल्याचे अद्यापही समोर आले असून, एकाच आवारात स्वॅब कलेक्शन आणि लसीकरण अशी स्थिती येथे आहे.

१६ जानेवारीपासून जिल्ह्यातही लसीकरण सुरू झाले होते. या लसीकरणासाठी प्रारंभीपासून जिल्हा रुग्णालयातील अतिरिक्त शल्य चिकित्सक कार्यालयाचा आवार अधिग्रहीत करण्यात आला. येथील तीन खोल्यांमध्ये नोंदणी, वेटिंग रूम आणि लसीकरण असे कक्ष तयार केले गेले आहेत. याठिकाणी तूर्तास लस घेण्यासाठी दिवसभरात ५००च्या जवळपास नागरिक हजेरी लावत आहेत. दरम्यान, याच परिसरापासून काही अंतरावर असलेल्या महिला रुग्णांच्या पुढील बाजूस रक्तपेढीत स्वॅब कलेक्शन सेंटर करून कोरोना चाचणी करण्यात येत आहे. यामुळे एकाच परिसरात बऱ्याचवेळा गोंधळही होत असल्याचे समोर येत आहे. ज्यांना चाचणी करायची आहे तेही लसीकरणाच्या ठिकाणी येऊन थांबत असल्याने या दोन ठिकाणांबाबत योग्य तो निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. स्वॅब सेंटर परिसरातच कोविड वाॅर्ड असल्याने कोरोना चाचणी कक्ष इतरत्र हलविण्याची मागणी सातत्याने होत आहे.

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा वेग दिवसेंदिवस वाढता आहे. २० हजारच्या जवळपास ज्येष्ठांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे, तर दुसरीकडे हेल्थ वर्कर आणि फ्रंटलाइन वर्कर यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येत आहे. ज्येष्ठांचा पहिला डोस पूर्ण झाल्याने दुसरा डोस घेण्यासाठी गर्दी होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, आता दुसऱ्या डोससाठी नागरिक येऊ लागले आहेत. यातून सध्या कोरोना रुग्णसंख्याही वाढत आहे. बाधितांच्या संपर्कात आल्याने अनेकजण स्वॅब तपासणी करून घेत आहेत. यासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था आहे. परंतु ही व्यवस्था कोरोना वाॅर्ड आणि नेत्रकक्ष या परिसरात आहे. येथून काही अंतर चालत गेल्यानंतर कोरोना लसीकरण केंद्र आहे. यातून या भागात सातत्याने नागरिकांची वर्दळ असते. यातून कोरोनाचा फैलाव हा अधिक तीव्रतेने होण्याची शक्यता असल्याने स्वॅब कलेक्शन सेंटर इतरत्र हलविण्याची मागणी करण्यात येत आहे.

महिला व पुरुष एकाच ठिकाणी

लसीकरण आणि कोरोना चाचणी करण्याच्या ठिकाणांवर महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र अशी व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. यातून महिला आणि पुरुष हे एकाच वेळी या परिसरात रांगेत उभे असल्याचे दिसून येतात. कोरोना चाचणीच्या ठिकाणी सावलीही नसल्याचे दिसून आले.

कर्मचारी संख्याही कमी

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील कामकाज वाढले आहेत. यात लसीकरण केंद्र, कोरोना चाचणी आणि नियमित रुग्ण सेवा यासाठी मनुष्यबळाची गरज भासत आहे. परंतु स्टाफ अपुरा पडत असल्याने अडचणी येत आहेत. कोरोना चाचणी करण्यासाठी एकच व्यक्ती आहे.