शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मोहिदा शिवारात लावले पिंजरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रतापपूर : तळोदा तालुक्यातील मोहिदा येथे वनविभागाने चार ठिकाणी पिंजरे लावून अस्वलाचा माग काढण्याचा प्रयत्न सुरु ...

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रतापपूर : तळोदा तालुक्यातील मोहिदा येथे वनविभागाने चार ठिकाणी पिंजरे लावून अस्वलाचा माग काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे़ दोन दिवसात येथे लावलेल्या कॅमेऱ्यातही प्राणी दिसून आलेला नसल्याची माहिती आहे़
तळोदा वनविभागाचे वनक्षेत्रपाल एऩजी़रोडे यांच्या मार्गदर्शनात मोहिदा शिवारात चार ठिकाणी पिंजरे लावण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली आहे़ याठिकाणी सापळा लावण्यात आला आहे़ बुधवारी दुपारी सहायक वनसंरक्षक ई़बी़चौधरी यांनी मोहिदा शिवारात जावून पिंंजऱ्यांची पाहणी केली़ याठिकाणी पाच ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आले आहेत़ सोमवारच्या घटनेनंतर या कॅमेºयांची दोन वेळा तपासणी करण्यात आली असून त्यात एकही प्राणी कैद झालेला नाही़ पिंजºयांमध्ये बिबट्या किंवा यापैकी कोणता प्राणी कैद होतो याकडे वनविभागासह मोहिदे परिसरातील ग्रामस्थांचेही लक्ष लागू राहणार आहे़
दरम्यान मोहिदा शिवारात मंगळवार आणि बुधवारी शुकशुकाट होता़ सायंकाळीही ग्रामस्थ घराबाहेर पडलेले नसल्याचे सांगण्यात आले आहे़ वनविभागाचे पथक सातत्याने ग्रामस्थांसोबत संवाद साधत आहे़ कळमसरे येथेही भेट देऊन माहिती देण्यात आली आहे़ तळोदा तालुक्यात पाण्याची उपलब्ध असल्याने शेतकरी बारमाही शेतीकडे वळले आहेत़ यात हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटनाही वाढल्या आहेत़ बहुतांश शेतकरी हे सायंकाळी किंवा रात्री उशिरा वीज पुरवठा सुरु झाल्यानंतर शेताकडे जातात़ यावेळी हिंस्त्र प्राणी लपून बसला असल्यास हल्ला होण्याची भिती असते़ या पार्श्वभूमीवर वनविभागाने रात्रीचे भारनियमन बंद करुन दिवसाच्यावेळेत शेतीसाठी वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे़ सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये किमान शेतीसाठी दिवसाच्या वेळेत वीज पुरवठा करण्याची मागणी आहे़ याबाबत गेल्या वर्षीही कंपनीकडे शेतकºयांनी पाठपुरावा केला होता़ परंतू त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात आले होत़े़ मोहिदे येथील घटनेनंतर भारनियमनाची वेळ बदलण्याची मागणी जोर धरत आहे़