शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चिंचपाडय़ात वीजबिल तक्रार निवारण शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 13:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिंचपाडा : नवापूर तालुक्यातील विसरवाडी व चिंचपाडा भागात वीज वितरणच्या ग्राहकांना अवास्तव वीजबिले दिले जात असल्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कचिंचपाडा : नवापूर तालुक्यातील विसरवाडी व चिंचपाडा भागात वीज वितरणच्या ग्राहकांना अवास्तव वीजबिले दिले जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारी लोकमतने प्रसिद्ध करीत संबंधितांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्याची दखल घेत चिंचपाडा येथे तक्रार निवारण शिबीर घेण्यात आले.वीज वितरणमार्फत चिंचपाडा येथे बहुसंख्य ग्राहकांना वीज जोडण्या देण्यात आल्या. परंतु या ग्राहकांना नेहमीच अवास्तव वीज बिले दिले जात होते, त्यानुसार नागरिकांमार्फत तक्रारी करण्यात येत होत्या. त्यात रिडींग घेतले जात नाही, वीजबिले मिळत नाही, अवाजवी बिले दिली जातात, अशा तक्रारी करण्यात आल्या होत्या. या सेवेला कंटाळलेल्या नागरिकांनी रोस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होता. नागरिकांच्या या तक्रारी लोकमतमधून प्रसिद्ध करीत वीज वितरण कंपनीच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या, त्याची दखल वीज वितरणमार्फत घेण्यात आली. नागरिकांच्या या समस्या सोडविण्यासाठी चिंचपाडा येथे वीजबिल तक्रार निवारण शिबीर घेण्यात आले. या शिबीरात एकुण 22 ग्राहकांमार्फत तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यात जयवंती श्रीकांत पाडवी, वसंत दामजी वसावे, वसंत कर्मा वळवी, नथ्थू पितांबर महाले, भिमसिंग देवला गावीत, विठ्ठल कांतीलाल वसावे, संतोष दत्तू वसावे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. हे शिबीर वीज वितरणचे कार्यकारी अभियंता वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले असून विसरवाडीचे सहाय्यक अभियंता अशोक पाटील, वायरमन दानियल गावीत यांनी घेतले. नागरिकांच्या तक्रारीनुसार त्या-त्या ग्राहकांच्या मिटरची तपासणी देखील करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांमरररध्ये काही अंशी समाधान व्यक्त करण्यात आले.