नंदुरबार जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 10:05 PM2020-07-14T22:05:26+5:302020-07-14T22:06:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे नंदुरबार येथील वृद्ध तर विसरवाडी येथील महिलेचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ दिवसभरात १५ ...

Both died of corona | नंदुरबार जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनामुळे नंदुरबार येथील वृद्ध तर विसरवाडी येथील महिलेचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ दिवसभरात १५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे़ जिल्ह्यातील बाधितांची संख्या २८७ तर मृतांची संख्या १४ झाली आहे़
नंदुरबार शहरातील जयवंत चौकात राहणाऱ्या ७१ वर्षीय वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मंगळवारी सकाळी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला़ सकाळी वृद्धासोबत अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या विसरवाडी येथील ५२ वर्षीय महिलेचा रात्री कोविड कक्षात उपचार सुरू असताना मृत्यू झाला़ दरम्यान दिवसभरात नंदुरबार शहरात आठ, शहादा येथे सहा तर विसरवाडी ता़ नवापूर येथील महिलेचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला़ होता़ यात नंदुरबार आणि विसरवाडी येथील मयत झाली असून उर्वरित १३ जणांवर कोविड कक्षात उपचार सुरू करण्यात आले आहेत़ सोमवारी रात्री उशिरा व मंगळवारी संपूर्ण दिवसात २१ जण कोरोनामुक्त झाले आहेत़
 मंगळवारी सकाळी विसरवाडी येथील ५२ वर्षीय महिला आणि नंदुरबार शहरातील भोई गल्लीत राहणाऱ्या ५२ वर्षीय महिलेचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता़ सायंकाळी नंदुरबार शहरातील सहा तर शहादा येथे सहा जणंचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत़ यात नंदुरबार शहरातील देसाईपुरा, गवळीवाडा, तुलसीविहार, दत्तकॉलनी, पळाशी ता़ नंदुरबार येथील प्रत्येकी एक, शहादा शहरातील ३, जयनगर, गुजरगल्ली, सरदार रेसीडेन्सी येथील प्रत्येकी एक अशा एकूण १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या २८७ असून यातील १७४ रुग्ण हे कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत़ जिल्हा रुग्णालय, एकलव्य रेसिडेन्शियलच्या कोविड कक्षात सध्या ८१ रुग्ण उपचार घेत आहेत़ जिल्ह्यात १० रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आहे़
सोमवारी आणि मंगळवार या दोन दिवसात खोंडामळी ता़ नंदुरबार, नंदुरबार शहरातील पंचायत समिती, सरस्वती नगर, रेल्वे कॉलनी, गांधीनगर, मंगल बाजार, गिरीविहार सोसायटी, कोकणी हिल व भट गल्ली, मोलगी ता.अक्कलकुवा, लोणखेडा ता.शहादा तसेच शहादा येथील सदाशिव नगर, कल्पना नगर, साईबाबा नगर, वृंदावन नगर, गांधीनगर व मोहिदे ता.शहादा येथील प्रत्येकी १ तर कुकडेल मराठा गल्ली शहादा आणि मिरा कॉलनी तळोदा येथील प्रत्येकी २ रुग्ण असे एकूण २१ तण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत़

 

Web Title: Both died of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.