शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

चेक बाऊन्स करून पैसे उकळणा:यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : देना बँकेच्या शहादा शाखेच्या कर्मचा:यांसोबत संगनमत करून बँकेने खातेदाराला न दिलेला चेक बाऊन्स करून ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : देना बँकेच्या शहादा शाखेच्या कर्मचा:यांसोबत संगनमत करून बँकेने खातेदाराला न दिलेला चेक बाऊन्स करून गैरमार्गाने पैसे उकळण्याचा प्रय} करणा:या मुख्य संशयित विजय अजरुन पाटील (रा.परिवर्धे, ता.शहादा ह.मु.नाशिक) यास पोलिसांनी अटक केली आहे. तीन वर्षापासून संबंधित संशयित हा पोलिसांच्या हाताला लागत नव्हता. त्याला न्यायालयात हजर केले असता 22 जुलैर्पयत न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.पोलीस सूत्रानुसार, नगीन खुशाल पाटील रा.मनरद ता.शहादा यांचे देना  बँकेत खाते आहे. पाटील यांनी देना  बँकेकडून कुठलाही चेक घेतलेला नाही अथवा बँकेने त्यांना चेक बुक दिलेले  नसताना संशयित  विजय पाटील याने नगीन पाटील यांच्या नावाचा देना बँकेचा सुमारे चार लाख 90 हजार रुपये रकमेचा चेक नागीन पाटील यांच्या खात्यातून बाऊन्स केला. आपण बँकेकडून कुठलाही चेक घेतलेला नसताना  व कोणालाही चेक दिलेला नसताना एवढय़ा मोठय़ा रकमेचा चेक आपल्या खात्यातून बाऊन्स झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी 9 जुलै 2016 रोजी शहादा पोलीस ठाण्यात विजय अजरुन पाटील व इतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता.दरम्यान, याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात नगीन पाटील यांनी शहादा पोलिसात दाखल केलेला गुन्हा व त्याची एफआयआर रद्द   व्हावी अशा मागणीच्या दोन रिट याचिका दाखल केल्या. औरंगाबाद खंडपीठाने दोन्ही याचिका फेटाळून लावल्यानंतर संशयित विजय पाटील याने शहादा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. या  प्रकरणातील संशयित विजय पाटील याने फिर्यादी नगीन पाटील यांच्याविरोधात नाशिक न्यायालयात धनादेशाचा अनादर केल्याची तक्रार नोंदविली होती. ही  तक्रार नाशिक न्यायालयाने फेटाळली आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य संशयित विजय पाटील याचा पोलीस शोध घेत होते. मात्र तो पोलिसांना आढळून येत नव्हता. 17 जुलैला विजय पाटील हा नाशिकमध्ये असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर व पथकाने त्यास ताब्यात घेऊन अटक केली. 18 जुलैला त्यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी  शेंडगे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 22 जुलैर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याकामी सरकार  पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता सचिन पाटील यांनी तर फिर्यादी नगीन पाटील  यांच्यातर्फे अॅड.प्रितेशकुमार जैन यांनी काम पाहिले.