अंबापूर येथे सार्वजनिक विहिरीत आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:31 AM2021-03-05T04:31:46+5:302021-03-05T04:31:46+5:30

पोलीस सूत्रानुसार, बुधवारी सायंकाळी गावातीलच प्रवीण टेंबऱ्या पवार यांनी तोरणमाळचे पोलीस पाटील सुरेश गुलाबसिंग आहेर (रा.अंबापूर) यांना माहिती दिली ...

Body found in public well at Ambapur | अंबापूर येथे सार्वजनिक विहिरीत आढळला मृतदेह

अंबापूर येथे सार्वजनिक विहिरीत आढळला मृतदेह

Next

पोलीस सूत्रानुसार, बुधवारी सायंकाळी गावातीलच प्रवीण टेंबऱ्या पवार यांनी तोरणमाळचे पोलीस पाटील सुरेश गुलाबसिंग आहेर (रा.अंबापूर) यांना माहिती दिली की, गावातीलच न वापरत्या सार्वजनिक विहिरीतून घाण वास येत आहे. त्यानुसार पोलीस पाटील सुरेश आहेर व ग्रामस्थांनी पाहणी केली असता कपड्यांवरून ओळख पटवून गावातीलच बिरबल लालसिंग पवार (४६) याचा असल्याचे समजल्यावरून म्हसावद पोलिसात पोलीस पाटील यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी मयताच्या नातेवाइकांकडून म्हसावद पोलिसात मयत बिरबल पवार हा हरविल्याची नोंद करण्यात आली होती. गावातीलच कोणाशी तरी भांडण झाल्यापासून तो बेपत्ता असल्याने त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? याबाबत तर्कवितर्क लावला जात आहे. या घटनेला मात्र मयताच्या नातेवाइकांनी दुजोरा दिला असून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. नातेवाइकांनी म्हसावद पोलिसात गुन्हा नोंदविणार असल्याचे प्रत्यक्ष भेट घेतली असता सांगितले. म्हसावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण पवार यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपासी अंमलदार भगवान धात्रक यांनी म्हसावद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Body found in public well at Ambapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.