भाजपा युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:46 IST2020-06-23T11:46:19+5:302020-06-23T11:46:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरात भारतीय जनता युवा मोर्चा नवापूर तालुका शाखेकडून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अग्रवाल भवन येथे ...

Blood donation camp by BJP Youth Front | भाजपा युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिर

भाजपा युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरात भारतीय जनता युवा मोर्चा नवापूर तालुका शाखेकडून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अग्रवाल भवन येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ३३ दात्यांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन खासदार डॉ.हीना गावीत व जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावीत यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत, चिटणीस एजाज शेख, नगरसेवक महेंद्र दुसाने, माजी नगरसेवक रमेशचंद्र राणा, युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस नरेश नाईक, घनश्याम परमार, हेमंत जाधव, भीमसिंग पाडवी, डॉ.जयेश अग्रवाल, शहर अध्यक्ष प्रणव सोनार, जयंती अग्रवाल, जाकीर पठाण, जैनू गावीत, दिनेश चौधरी, समीर दलाल, सौरव भामरे, स्वप्नील मिस्त्री, शैलेश सैन, सुभाष गावीत आदी उपस्थित होते.
या वेळी खासदार डॉ.हीना गावीत म्हणाल्या की, नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जिल्ह्यातील असंख्य नागरिक देशातील विविध भागात अडकून पडले होते. त्यांना शासकीय योजनेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात आणले गेले. जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी होऊन जिल्हा परत ग्रीन झोनमध्ये यावा यासाठी नागरिकांनी शासनाने दिलेल्या आदेशांचे वेळोवेळी पालन करुन सहकार्य करावे, असे आहवान केले. भरत गावीत यांनी म्हणाले की, कोरोनामुळे रक्ताची केव्हाही गरज पडते. हे पाहता जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करुन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले. शिबिरात ३३ दात्यांनी रक्तदान केले. हे रक्त गुजराथ राज्यातील व्यारा येथील जनक हॉस्पिटल रक्तपेढीत पाठविण्यात आले. सूत्रसंचालन कुणाल दुसाने यांनी केले.

Web Title: Blood donation camp by BJP Youth Front