राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रक्तदान शिबिरात ४२ युवकांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:31 IST2021-04-22T04:31:34+5:302021-04-22T04:31:34+5:30

कोरोना महामारीसारख्या संकटकाळात कोविड बाधित रुग्णांसह अन्य रुग्णांना ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि रक्तसाठ्याची गरज भासत आहे. म्हणून ...

Blood donation of 42 youths in the blood donation camp of NCP Youth Congress | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रक्तदान शिबिरात ४२ युवकांचे रक्तदान

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रक्तदान शिबिरात ४२ युवकांचे रक्तदान

कोरोना महामारीसारख्या संकटकाळात कोविड बाधित रुग्णांसह अन्य रुग्णांना ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि रक्तसाठ्याची गरज भासत आहे. म्हणून सामाजिक बांधीलकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने चौपाळे येथील रामदेवबाबा मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या हस्ते श्रीराम नववीनिमित्त प्रभूरामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष सागर तांबोळी, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील, आमदार रोहित पवार फॅन्स क्लबचे जिल्हाध्यक्ष राजरत्न बिरारे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस कमलेश चौधरी, राष्ट्रवादीचे नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, इंजि.बी.के.पाडवी, शहादा तालुकाध्यक्ष महेंद्र कुवर, राजू पाटील, प्रकाश मगरे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष वामन पिंपळे, जिल्हा उपाध्यक्ष विक्की बिरारे आदी उपस्थित होते. या शिबिरात ४२ युवकांनी रक्तदान केले. रक्त संकलनासाठी जनकल्याण रक्तपेढीचे प्रकाश भोई, पुष्पा नायक, मनिष पवार, गोरख भिल, संजय सूर्यवंशी या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Blood donation of 42 youths in the blood donation camp of NCP Youth Congress