शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

पाणी व घरपट्टी माफ करण्याची भाजपची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार नगरपरिषदेने स्व:मालकीच्या इमारती ज्या संस्थांना भाडे कराराने दिल्या आहेत त्यांच्याकडील वीजबिलासह थकित करांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार नगरपरिषदेने स्व:मालकीच्या इमारती ज्या संस्थांना भाडे कराराने दिल्या आहेत त्यांच्याकडील वीजबिलासह थकित करांच्या रकमा वसुल कराव्या, शहरातील मालमत्ताधारकांना घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी. यावर निर्णय घेण्यासाठी तातडीने विशेष सभा बोलवावी अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे.भाजपचे डॉ.रवींद्र चौधरी, विरोधी गटनेते चारुदत्त कळवणकर, प्रतोद आनंदा माळी आणि भाजपाच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांना याबाबत पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोनामुळे राज्याच्या प्रत्येक शहरात व गावागावात आर्थिक संकटाची भीषणता समोर येऊ लागली आहे. शहरातील सर्व करदात्यांना आर्थिक विवंचनेला तोंड द्यावे लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पालिकेची सभा बोलवावी आणि मालमत्ताधारकांना कर माफी देण्याचा ठराव करण्यात यावा. याशिवाय पालिकेच्या स्व:मालकीच्या इंदिरा मंगल कार्यालय, सीबी गार्डन, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, यशवंतराव चव्हाण क्रीडा संकुल व अन्य इमारती विविध संस्थांना भाडेकरारावर देऊन ठेवलेल्या आहेत. त्यांच्याकडे अनेक वर्षांपासूनची विज बिले आणि मालमत्ता करासह विविध रकमांची थकबाकी आहे. ती वसूल केल्यास १० कोटी रुपये उत्पन्न नगर परिषदेकडे जमा होऊ शकते. म्हणून ती रक्कम नगरपालिकेने ताबडतोब वसूल करावी आणि कोरोना मुळे ऊद्भवलेल्या स्थितीच्या पाशर््वभूमीवर शहरातील सर्व मालमत्ताधारकांना घरपट्टी पाणीपट्टी सह विविध कर माफी देऊन त्यांची रक्कम या १० कोटी रुपयातून अदा करण्यात याव्या. त्यासाठी सभा बोलावून ठरावाद्वारे निर्णय करावा. कर्मचारी आणि पोलिस प्रशासनातील कर्मचारी यांना नगरपरिषदेकडून प्रोत्साहन भत्ता अदा केला जावा. यासह इतर विषयांवर चर्चेसाठी तातडीने पालिकेची विशेष सभा बोलवावी अशी मागणी यात करण्यात आली आहे.