दुचाकी चोरटा सीसीटीव्हीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:30 IST2021-04-18T04:30:18+5:302021-04-18T04:30:18+5:30

नवापूर : दुचाकी चोरताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून भरचौकातील त्याच्या सर्व घडामोडी कैद झाल्या आहेत. नवापूर शहरातील ...

Bike thief on CCTV | दुचाकी चोरटा सीसीटीव्हीत

दुचाकी चोरटा सीसीटीव्हीत

नवापूर : दुचाकी चोरताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून भरचौकातील त्याच्या सर्व घडामोडी कैद झाल्या आहेत.

नवापूर शहरातील आंबेडकर रोड परिसरात राहणारे संदीप बाबूराव दुसाने यांची लाल रंगाची हिरो होंडा पॅशन प्रो मोटारसायकल गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास चोरीला गेली. भरचौकात गोपाल ज्वेलर्सच्या दुकानाजवळ मोटारसायकल (जी.जे. १९ आर ४३१५) लावली होती. चोरट्याने मोठ्या शिताफीने हँडल लॉक तोडून मोटारसायकल लंपास केल्याची घटना घडली आहे. सदर प्रकार रात्री एकच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लाल रंगाचा शर्ट घातलेला चोरटा हळुवारपणे मोटारसायकल काढतो त्यानंतर पुढे जाऊन किक मारून मोटारसायकल सुरू करून लंपास करतो. या सर्व घडामोडी सीसीटीव्हीत आल्या आहेत. असे असतानाही पोलिसांकडून तपासाबाबत फारशी प्रगती नसल्याचे चित्र आहे.

Web Title: Bike thief on CCTV