शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

असली ते नकट्यादेव रस्त्याच्या कामाचे १४ रोजी भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:31 IST

सातपुडा डोंगररांगेतील दळण वळणाच्या विकासापूर्वी शहादा ते धडगाव रस्त्यावर दोनच पूल होते. त्यावेळी ॲड. पाडवी यांना स्वतः प्राथमिक शिक्षणापासून ...

सातपुडा डोंगररांगेतील दळण वळणाच्या विकासापूर्वी शहादा ते धडगाव रस्त्यावर दोनच पूल होते. त्यावेळी ॲड. पाडवी यांना स्वतः प्राथमिक शिक्षणापासून ते १२ वीपर्यंतच्या शिक्षणासाठी शहरी भागात जाताना असली, अस्तंबा, नकट्यादेव, गोऱ्यामाळ, रापापूर या मार्गाने तळोदापर्यंत पायवाटेने पायी चालत जावे लागत होते. याची जाणीव ठेऊन त्यांनी आमदार झाल्यानंतर शहाद्यासह धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील रस्ते आणि ३५० ते ४०० लहान मोठे पूल तयार केले व खऱ्या अर्थाने सातपुड्यातील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले.

नर्मदा नदीचा काठावरील गावपाड्यांना मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे तयार केले. तळोदा, कोठार, चांदसैली, धडगाव रस्ता कामाची सुरुवात करून या भागासाठी ॲड.पाडवी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

असली व जुना अस्तंभा तसेच इतर भागातील गाव पाड्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचता यावे यासाठी रस्ते व पूल उभारले. मात्र असली गावापासून जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी शहादा, कोठार, अक्कलकुवामार्गे वळसा घालून यावे लागते आणि त्यात अधिक वेळ लागतो. नकट्यादेव रस्ता हा अक्कलकुवा, धडगाव व तळोदा या तीन तालुक्याना जोडणारा रस्ता ठरावा आणि या भागातील ग्रामस्थांना एका तासातच जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचता यावे व एका दिवसात आपली कामे करून परत घरी पोहोचता यावे, असा पालकमंत्री ॲड.पाडवी यांचा प्रयत्न असून, या रस्त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होत आहे. ४० वर्षांपूर्वी सातपुड्यातील मुलं शिक्षणासाठी ज्या रस्त्याने बाहेर पडली त्या रस्त्याच्या निर्मितीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक असलेले ॲड.पाडवी यांच्यासाठी हा स्वप्नपूर्तीचा क्षण असणार आहे.