वराह पकडण्याच्या वादातून तळोद्यात मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:27 IST2021-04-19T04:27:32+5:302021-04-19T04:27:32+5:30

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,तळोदा येथील मरीमाता गल्लीत राहणारे सुभाष अशोक कुराडे व अनिल मंगल कुराडे, रामू नानाजी पाडवी हे ...

Beating in the pond over a pig-catching dispute | वराह पकडण्याच्या वादातून तळोद्यात मारहाण

वराह पकडण्याच्या वादातून तळोद्यात मारहाण

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,तळोदा येथील मरीमाता गल्लीत राहणारे सुभाष अशोक कुराडे व अनिल मंगल कुराडे, रामू नानाजी पाडवी हे शनिवार, १७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कुंभारवाडा परिसरात वराह पकडण्यासाठी गेले होते. यावेळी तनवीर शेख शरीफ हा त्याच्या घरी होता. सुभाष, अनिल, रामू याना तनवीरने वराह नंतर पकडा, असे सांगितले असता त्यांच्यात वाद निर्माण झाला. वादाचे पर्यावसन शिवीगाळ व नंतर हाणामारीत झाले. या हाणामारीत अनिल कुराडे, सुभाष कुराडे, रामू पाडवी यांना तर दुसऱ्या गटातील शेख तनविर शेख,सरीफ, शेरखान अजीजखान पठाण, हाजी शेख शरिफशेख सरदार,सुलतानाबी शरीफ यांना मुक्का मार लागला आहे. मारहाणीत अनिल कुराडे याला लाकडी दांड्याने मारहाण करून डोक्याला दुखापत केल्याचा आरोप करण्यात आला तर सुलतानाबी शरीफ हिला देखिल ओठांना जखम झाल्याचे सांगितले जात होते.

तनवीर शेख शरीफ याने दिलेल्या फिर्यादीवरून तर दुसऱ्या गटाकडून अनिल कुराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकमेकांच्या विरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे जमावाला पांगवण्यात यश आले. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास आ.राजेश पाडवी यांनीदेखील पोलीस स्टेशनला प्रकरण समजून घेत दोन्ही गटांच्या वरिष्ठांना बोलून वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न केले. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनीदेखिल रात्री दहा वाजेच्या सुमारास तळोदा येथे धाव घेतली व परिस्थितीची पाहणी केली. पोलीस निरिक्षक पंडितराव घुमरे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

Web Title: Beating in the pond over a pig-catching dispute