घर खरेदीच्या वादातून मारहाण व नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 11:17 IST2020-01-30T11:17:29+5:302020-01-30T11:17:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : घर खरेदीच्या वादातून दोघांनी एकास बेदम मारहाण करून घरातील सामान फेकून दिल्याची घटना शहादा ...

Beaten and devastated by the promise of a home purchase | घर खरेदीच्या वादातून मारहाण व नासधूस

घर खरेदीच्या वादातून मारहाण व नासधूस

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : घर खरेदीच्या वादातून दोघांनी एकास बेदम मारहाण करून घरातील सामान फेकून दिल्याची घटना शहादा येथील साईबाबा नगरात २८ रोजी घडली. दोघांविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा येथील उकाराम सुजारा चौधरी व तुकाराम गलाराम चौधरी यांच्यात घर खरेदीचा वाद होता. त्या वादातून २८ रोजी तुकाराम गलाराम चौधरी, सोगोदेवी उकाराम चौधरी, दोन्ही रा.खापर यांनी उकाराम यांना साईबाबा नगरात बेदम मारहाण केली.
शिवाय घराचे कुलूप तोडून घरात घुसून सामान अस्ताव्यस्त फेकून दिला. त्यात घराचे मोठे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत उकाराम चौधरी यांनी फिर्याद दिल्याने दोघांविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक शेख करीत आहे. संशयीताचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Beaten and devastated by the promise of a home purchase